Wednesday, January 29, 2020

राहू | वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडले !



राहू प्रतिनिधी : ता.२९ जाने २०२०

 राहु ता.दौंड येथील मुख्य चौकाजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडले असून या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
याबाबत रात्री उशिरापर्यंत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
वाघोली कडून राहुच्या दिशेनेच जात असलेल्या स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच 19 डि. एम. 5847 वरून दोघे जण प्रवास करत होते.पाठीमागून येत असलेल्या वाळू वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच 14 इ.एम 8865 ने दुचाकीला धडक दिली.

 या धडकेने दुचाकीवरील दोघेही ट्रकखाली  चिरडले गेल्याने शिवाजी बाबु चव्‍हाण वय 40 राहणार पाथरे चाळीसगाव व गोकुळ लक्ष्मण राठोड वय 40 राहणार तळंदे चाळीसगाव यांचा जागीच मृत्यू झाला.
मात्र ट्रक ड्रायव्हर तेथून ट्रक घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

परिसरातील ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पिंपळगाव येथील आवाळे वस्ती नजीक पकडले.
 याबाबतची खबर पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांनी यवत पोलिस ठाण्यात दिल्यानंतर यवत पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने या ठिकाणी दाखल झाले.
दोन्ही मृतदेह त्यांनी ताब्यात घेत ट्रक ड्रायव्हर व ट्रक  देखिल ताब्यात घेतला. याबाबतचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.याचा पुढील तपास यवत पोलिस करत आहे.