दापोडी | गटविकास अधिकारी यांच्या सूचनेकडे केल जातयं दुर्लक्ष (भाग-०१)

- केडगाव प्रतिनिधी ता.०८ जाने २०२० दापोडी ता.दौंड येथे महावितरण कंपनी समोर कच-याचे ढिग सगळीकडे साचवले जात आहेत.टोलनाका ते दापोडी या रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीसमोर रोज कचरा साठवला जात आहे.व रोज संध्याकाळी हा कचरा पेटवला जात आहे.धुर इतक्या मोठ्या प्रमाणात होत असतो कि रस्त्याने येना-या वाहनाना पुढील रस्त्याचा अंदाज येत नाही.यामूळे किरकोळ आपघात झाले आहे.याबाबाबत ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार केल्या तरी याबाबत ठोस काही कारवाई होत नाही. ग्रामपंचायतीला गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी देखिल याबाबत सुचना केल्या होत्या.मात्र या सूचनेकडे ग्रामपंचायत दुलक्ष का करत आहे हे समजत नाही?
- आता ग्रामपंचायत मोठ्या आपघाताची वाट पाहत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.जर कचरा टाकन-यावर जर कारवाई केली तर हे प्रश्न निर्माण होणार नाही. कचरा टाकना-याला ग्रामपंचायत पाठीशी घालत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामूळे बिनधास्तपणे कचरा टाकुन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
- सांसद आदर्श गाव दापोडीमध्ये जर रस्त्याने कच-याचे ढिग दिसू लागले तर काय म्हणावे हा कचरा येतो तो गायरान जागेत अतिक्रमण केलेल्या ठिकानाहुन एवढे माहित असताना देखिल कारवाई का होत नाही ?