केडगाव प्रतिनिधी ता.०२ डिसें
वाखारी ता.दौंड येथे पुणे-सोलापुर हायवेवर ट्रकला बोलेरोने (ता.०१) रोजी रात्रीच्या १.०० वाजण्याच्या सुमारास धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. सविस्तर माहिती आशी की, ट्रक नं MH.12 AR 2586 ता 1/1/2020 रोजी रात्री 1च्या सुमारास पुणे सोलापुर हायवेवरुन वळण घेत असताना एक बोलेरो जीप वेगाने येऊन ड्रायव्हर साईडला असलेल्या डिझेल टाकी जवळ धडक बसून अपघात झालाआहे.
बोलेरो जीपमधील ड्रायव्हर व त्यामधील असलेल्या 7 ते 8 महिला यांना अपघातात होऊन गंभीर व किरकोळ दुखापत झाली आहे.बोलेरो मधील जखमींना जीप मधून बाहेर काढून बोरीपारधी येथील खाजगी दवाखाण्यात अॅङमीट करण्यात आले आहे. जीप नं mh 42 K 0819 आसा आहे. सदर अपघात हा बोलोरो मधील चालक संदीप पाराजी वाघमोडे रा.बोरिपारधि यांच्या चुकीमुळे झाला असल्याची फिर्याद शिवाजी तुळशीराम बंगर रा.भायाळा यांनी दिली आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धनंजय कापरे, पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे हे करत आहे.
पोलिस काॅनस्टेबल बाळासाहेब चोरमले व पोलीस शिपाई दिपक यादव यांनी अपघात ठीकाणी मदत केली.