Tuesday, January 7, 2020

कुरकुंभ | दहावीच्या विद्यार्थ्यांची पंधरा वर्षांनी भरली शाळा !



कुरकुंभ प्रतिनिधी : ता.०७ जाने २०२०

कुरकुंभ येथे श्री फिरंगाई माता विद्यालय मध्ये  २००४  सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षांनी एकत्र येत  जुन्या आठवणींना  उजाळा दिला.यावेळी शाळेत माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य नानासो भापकर  होते . 

शाळा कॉलेज संपले की , प्रत्येक जण आपआपल्या  करिअरच्या क्षेत्राकडे धाव घेत असतो. ज्या शाळेमध्ये  आपण शिकलो , लहानाचे मोठे झालो,   येथील जुन्या मित्रांना मैत्रिणींना  भेटावे. असे विचार सर्वाना येत असत परंतु कामांच्या व्यापात शक्य होत नव्हते. परंतु या विद्यालयात २००४  सालच्या  दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम  घेऊन या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या निमित्त ३५ ते  ४० मुले व मुली एकत्र आल्या. यावेळी या विद्यार्थांमधून कोण इंजिनिअर, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, तर कोण उद्योजक झाले आहेत . हे पाहून शाळेचे प्राचार्य नानासो भापकर यांचे मन खूप भरावून गेले . यावेळी या विद्यार्थ्यांनी  आपल्या करिअरमध्ये  नाव कमावल्याने भापकर यांनी शाबासकी दिली. 

 शाळा सोडल्यानंतर पुन्हा  संमेलनाच्या निमित्ताने भेटल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. सर्व एकमेकांची कुटूंबाची आपुलकीने विचारपूस करू लागले . यावेळी माजी शिक्षक देखील उपस्तिथ होते. या शिक्षकांनी आपआपले मनोगत व्यक्त करत असताना या मुलांना असे वाटले की आपण पुन्हा या शाळेत शिकत आहोत की काय या शिक्षकांचे मनोगत  ऐकण्याची संधी या विद्यार्थ्यांना पुन्हा मिळाली. या वेळी शिक्षकांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी या विध्यार्थ्यांनी  आदरभावाने शिक्षकांचे  चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले.  या स्नेह संमेलना वेळी माजी विद्यार्थ्यांनी या शाळेत वीस वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले.  तसेच माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला एक लोखंडी कपाट भेट देण्यात आले या वेळी धनंजय गाढवे, अजिनाथ भुजबळ , विकास पवार, अमृता लोणकर,  या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी झगडे व रुपाली देशमुख यांनी केले तर आभार संदीप जगताप यांनी केले.