Saturday, January 4, 2020

सुतार दांपत्याला पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ तपस्येनंतर अपत्यप्राप्ती !

मांडवगण फराटा प्रतिनिधी : ता.०५ जाने २०२०

मांडवगण फराटा येथील दांपत्याला सुमारे २५ वर्षांनंतर डॉ.अतुल सुराणा व डॉ.सारिका सुराणा यांच्या प्रयत्नांमुळे अपत्यप्राप्तीचे सुख अनुभवायला मिळाले.

याबाबत सविस्तर असे की, नैना चंद्रकांत सुतार यांच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण होऊन देखील सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असताना हे दाम्पत्य संतती प्राप्तीपासून वंचित होते त्यासाठी त्यांनी सर्व शर्थीचे प्रयत्न करून देखील त्यास म्हणावे असे यश येत नव्हते त्यामुळे त्यांनी अपत्य प्राप्तीचा विचार जवळपास सोडलाच होता. हि व्यथा मांडवगण फराटा येथील डॉ.अतुल सुराणा व डॉ.सारिका सुराणा यांना सांगितली. त्यानुसार त्यांनी सर्व रिपोर्ट्स पाहून आपण एक शेवटचा प्रयत्न करून पाहू असे म्हणून आधार दिला व ते सर्व रिपोर्ट्स  पाटस येथील डॉ धवल वैद्य यांना दाखवून त्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी करण्याचा निर्णय घेतला .पण त्यापूर्वी गर्भाशयात असलेल्या गाठी काढणे गरजेचे होते.त्यानुसार त्या गाठी काढण्यात आल्या.नियतीच्या मनातही चांगले असल्याने पहिल्याच प्रयत्नात सुतार दाम्पत्यांना गर्भधारणा झाली पण खरी कसोटी इथून पुढे होती,  कारण नैना सुतार यांना मधुमेहाचा आजार जडला होता. त्यामुळे डॉ.वैद्य व डॉ.सुराणा यांनी मधुमेहावर यशस्वीरीत्या नियंत्रण ठेवून गर्भधारणेचे नऊ महिन्यांचे टप्पे पार पडले.अखेर तब्बल पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ तपस्येनंतर सुतार दाम्पत्याने एका गोंडस बाळाला जन्म दिला .विहान आय व्ही एफ सेंटर च्या माध्यमातून गरजू रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याचा मानस डॉ.धवल वैद्य  यांनी व्यक्त केला .तसेच आतापर्यंत ३४ आय व्ही एफ पैकी २८ जणांना यशस्वीरीत्या गर्भधारणा करून देण्याचा मोलाचा वाटा डॉ धवल वैद्य यांनी व्यक्त केला. तसेच सुतार दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आमची कामाची पावती असल्याचा आनंद   डॉ.वैद्य व डॉ.सुराणा यांनी व्यक्त केला व यापुढील  काळातही गरजू रुग्णांसाठी व त्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.