पाटस प्रतिनिधी ता : १२ जाने २०२०
पाटस टोल नाक्यावर (ता.११) रोजी दुपारी १२ ते ०१ च्या दरम्यान ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान उदघाटन सोहळा घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमाची सुरुवात वाहन चालक यांच्यासाठी नेत्र तपासणी शिबिराद्वारे करण्यात आली.त्यानंतर वाहन चालाकाना वाहतूक नियमावलीची पत्रके वाटण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी आर.टी.ओ निरिक्षक खटावकर,पो उप-निरीक्षक ड़ोखे,यवत पो स्टे पो उप निरीक्षक घाडगे,पाटस टोल नाका व्यवस्थापक लेखरा आणि स्टाफ व अखील भारतीय ग्राहक मंचाचे दौंड तालुका संघटक विश्वास ताकवणे तसेच वाहन चालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन स.पो.नि नांद्रे म पो केंद्र बारामती फाटा यांनी व त्यांच्या सहकर्यनी केले.