Tuesday, January 28, 2020

वरवंड | कुसुम सरणोत यांच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली !

केडगाव प्रतिनिधी : ता.२९ जाने २०२०

वरवंड ता.दौंड येथील स्वर्गीय श्रीमती कुसुम बाई पोपटलाल सरणोत वय वर्षे ८५ सकाळी सात वाजता त्यांचे दुःखद निधन झाले आहे.
तसेच त्यांच्या परिवाराने नेत्रदानाचा निर्णय घेतला आणि एक मित्र एक वृक्ष या संघटनेशी संपर्क करून नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली.
नेत्र तज्ञ डॉ.प्रेमकुमार भट्टड, डॉ.विजय दिवेकर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.बनसोडे व एक मित्र एक वृक्ष संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली वरवंड येथील तिसरे नेत्रदान पार पडले आहे.
एक मित्र एक वृक्ष ही सामाजिक संस्था दौंड तालुक्यात नेत्रदान व वृक्ष लागवड या संदर्भात चांगले उपक्रम राबवत असतात.
या ग्रुपचे हे २१ वे नेत्रदान होते. त्यांच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली व स्वर्गिय कुसुमबाई नेत्ररूपी अमर झाल्या आहेत.
मागील वर्षी या परिवारातील  स्व.राजेंद्र सरनोत यांनी नेत्रदान केले होते.
कुसुम बाई यांच्या अंत्ययात्रेत नेत्रदान जनजागृती व्हावी म्हणून नेत्रदान करा,सर्व श्रेष्ठ दान नेत्रदान असे संदेश देणारे फलक तयार केले होते.

नेत्र तज्ञ डॉक्टर प्रेम कुमार भट्टड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून डोळे नेत्र पिढीला पुण्याला पाठविले आहेत.