केडगाव प्रतिनिधी : ता.१६ जाने २०२०
पारगाव ता.दौंड येथील राजगृह ग्रंथालय या ठिकाणी पुस्तक भेट सोहळा (ता.१६) रोजी पार पडला.
राजगृह ग्रंथालयांस गजलकर ए.के.शेख आणि त्यांचे बंधू कवि युनूस शेख यांनी ग्रंथालयास एकूण १३९ पुस्तके यावेळी भेट दिली.
यावेळी कार्यक्रमास सयाजी ताकवणे (विद्यमान पं.समिती सदस्य),पोपट ताकवणे (माजी दौंड तालुका अध्यक्ष आय कॉग्रेस),संभाजी ताकवणे(मा.उपसरपंच ग्रा.पं.पारगाव),सुभाष बोत्रे(मा.चेअरमन खरेदी विक्री संघ),पांडुरंग भांडळे,चांदभाई मणियार (अल्पसंख्याक अध्यक्ष दौंड तालुका),राजाभाऊ बोत्रे (मा.तंटामुक्ती अध्यक्ष पारगाव),कवि युनुसभाई शेख,डॉ.सागर शिंदे,डॉ.सुजाता शिंदे,दशरथ बोत्रे (मा.चेअरमन भि.पा.पु पारगाव),राजेंद्र आढगळे,रजनीकांत वनशिव,अमर वनशिव (अध्यक्ष दौंड तालुका),विजयराव वनशिव (सल्लागार रमाई वधु वर सूचक केंद्र) व आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवराचे स्वागत ग्रंथालयाचे अध्यक्ष अमर वनशिव यांनी केले तसेच विजय वनशिव यांनी आभार मानले.यावेळी युनूसभाई शेख यांचा ग्रंथालया तर्फे सत्कार करण्यात आला.