यवत प्रतिनिधी दि 26
दौंड तालुक्यातील पश्चिम पट्यातील डाळींब (ता दौंड ) दिवसाढवळ्या अवैध वाळू तस्करी जोमात सुरू असून गेल्या अनेक महिन्यापासून बेकायदेशीर चोरी चालु आहे, महसुल विभागाच्या आशीर्वादाने पंधरा ते पंचवीस फूट खोल जमिनीत अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे,हजारो ब्रास वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहीती स्थानिक ग्रामस्थांनी दिली,या कडे मात्र महसुल अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे मात्र संबंधित महसुलच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल असुन कारवाई कधी होणार हा प्रश्न जनतेमधुन होत आहे.
रात्रीचे सात वाजले कि वाळूची ट्रक भरली जाते,रात्रभर वाहतुक केली जाते दिवस उजेडला कि बंद असे गेले चार महीन्यापासुन चालु असुन या ठिकाणी रात्रीच्या वेळी ट्रकंचा आवाज व ट्र्कटर च्या आवाजाने नागरिक त्रास्त झाले आहेत, काही गावागावातील वस्तीकडे येणारा रोड खचला गेला आहे.
या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन झाले, तालुक्याच्या पश्चिम पट्यात दिवसाढवळ्या वाळू तस्करी केली जात असुन स्थानिक महसुल अधिकारी कारवाई करत नसल्याने मलिदा कुठपर्यंत पोहचतो ? असा सवाल उपस्थित होत आहे,ज्या शेतामध्ये वाळू काढले गेले आहे त्या ठीकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे, ओढ्या लगत वाळू काढण्याचे प्रमाण चालु आहे, ज्या ठिकाणी ओढा असेल त्या ठिकाणी पुढे पाणी येणे आवघड झाले आहे.
अनधिकृतपणे करण्यात येत असलेल्या या वाळू उपश्यामुळे शासनाचा महसुल बुडत असला तरी अधिकारी मात्र शांत का ? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे,उपसा करणाऱ्या तस्करांचे अधिकार्यांशी लागेबांधे असल्याने महसुल विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यास धजावत नसल्याची परिस्थिती आहे, या परिसरातील असे अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी वाळू तस्करी चालु आहे, आता कारवाई कोन करनार हे महत्वाचे ठरणार आहे, या बाबत यवत चे सर्कल कोकरे यांना संपर्क साधला असता त्यांचा शी संपर्क होऊ शकला नाही .