यवत प्रतिनिधी : (ता.१६ जाने २०२०) प्रहार जनशक्ती या पक्षाची दौंड तालुका कार्यकारिणी पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र जाधव यांनी नुकतीच जाहीर केली आहे या निवडी कार्यकारिणीमध्ये दौंड तालुक्यातील सर्व विभागाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. कार्यकारिणी या प्रमाणे रवींद्र जाधव दौंड तालुका अध्यक्ष, आप्पासो रांधवण कार्याध्यक्ष, संदीप सोनवणे उपाध्यक्ष ,महादेव चौधरी सचिव, गोरख सुतार सरचिटणीस, रमेश होलम संघटक, शरद गायकवाड संपर्कप्रमुख, भाऊसाहेब कदम समन्वयक.
या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव म्हणाले आमचा तालुक्यामध्ये नवीन पक्ष असला तरी आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही लोकांच्या फायद्याचे प्रश्न असतील तेथे आमचा पाठिंबा राहील. समाजकारण अगोदर केले जाईल .चुकीचे काम असेल तर विरोध करणार म्हणजे करणार. अन्याय होऊ देणार नाही. पक्षाचे अध्यक्ष मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली जाईल. खडकवासला धरणातील पाण्याबाबत ही शेतकर्यांच्या बाजूने आवाज उठवला जाईल.