Thursday, January 9, 2020

यवत पोलिसांनी लावला गाडी चोरांचा छडा !

         
            
यवत प्रतिनिधी ता.०९ जाने २०२०

यवत पोलीस स्टेशन हद्दीत गेले काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढलेले असल्याने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी यवत पोलीस स्टेशनच्या स्टाफला मोटर सायकल चोरांचा शोध घेणे बाबत सूचना दिलेल्या होत्या.त्याबाबत पोलीस नाईक बनसोडे व पोलीस कॉन्स्टेबल पंडित हे दिनांक 7/1/2020 रोजी सायंकाळी पुणे सोलापूर हायवे रोडवर पेट्रोलिंग करीत असताना यवत रेल्वे स्टेशन रोडवर दोन मोटार सायकल रेल्वे स्टेशन कडे जाताना दिसले त्यांचे गाडीला मागे नंबर प्लेटवर चिखल लागलेला दिसल्याने पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांना पाहताच मोटारसायकल जोरात पळविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले त्यांना पकडून त्यांना नाव पत्ता तसेच गाडीचे पेपर बाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना यवत पोलीस स्टेशन येथे आणून विचारपूस करता त्यांनी सदरची गाडी ही सहजपूर थोरात वस्ती येथून चोरलेली असल्याचे सांगून आम्ही अजून बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीच्या नऊ मोटारसायकल चोरलेल्या असल्याचे सांगितले त्यांची नावे खालील प्रमाणे 

1)बाळू उत्तम शिंदे वय 32 वर्ष राहणार कोरेगाव भिवर तालुका दौंड जिल्हा पुणे 

2)सोमनाथ आनंद शिंदे वय 34 वर्ष राहणार कोरेगाव भिवर तालुका दौंड जिल्हा पुणे

 यातील आरोपी नंबर 1 व 2 यांना यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 16/ 2020 भादवि कायदा कलम 379 या गुन्ह्यात अटक केली असून दौंड न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी दिलेली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून ही वेगवेगळ्या कंपनीच्या नऊ मोटारसायकल अंदाजे किंमत रुपये दोन लाख चा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे तसेच त्यांनी आणखी बऱ्याच मोटारसायकल चोरल्याचा संशय असल्याने त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे सदरची कामगिरीही ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना,उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा ,पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यवत पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार पोलीस हवालदार महेश बनकर ,पोलीस नाईक दशरथ बनसोडे ,गणेश पोटे पोलीस कॉन्स्टेबल संतोष पंडित, विसहाल गजरे,विनोद रासकर ,नारायण जाधव ,पोलिस होमगार्ड नवनाथ वेताल यांच्या पथकाने केली आहे.