भाग - ०१
दौंड प्रतिनिधी : ता.१४ जाने २०२०
दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत गॅस पाईपलाईनचे काम सध्या चालू झाले आहे.हे काम न्हावरा ता.शिरूर या बाजूने चाफुला ता.दौंड या दिशेने सुरु झाले आहे.हे काम नियमात नसून,सर्व नियम धाब्यावर बसवून काम सध्या सुरुच आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतालगत असणार्या पाईप लाईन या खोद्कामामुळे उध्वस्त होऊ लागल्या आहेत.याबाबतची कल्पना शेतकरी व ग्रामपंचायतला दिली नसून,कंत्राटदार मनमानी करून काम करत आहे.अशी माहिती माजी उपसरपंच संभाजी ताकवणे यांनी दिली आहे.संबधित कामगारांना कागदपत्रांची मागणी केल्यास,उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.व दबक्या आवाजात नागरिकांकडून बोलले जात आहे कि, कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची अशी चर्चा आहे.
रस्त्याच्या बाजूने व रस्ता क्रॉस करून भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटर अंतरावर किंवा उपलब्ध रस्त्याच्या हद्दीलगत जमीन खोदून जमिनीच्या पृष्ठभागापासून १.२० मीटर पेक्षा जास्त खोलीवर टाकण्यात यावी. गॅस पाईपलाईन ही अस्तित्वातील रस्त्यावरील मोर्या,लहान पूल व मोठे पूल यांच्यावरून किंवा त्यांच्या लगत टाकू नये.सदरील काम करताना वाहतूक सुरक्षेतेच्या दृष्टीने खोदाई सुरु करण्यापूर्वी पूर्ण ५०० मिटर लांबीत बॅरीकेडस व सूचना फलक उभारण्यात यावे अशा नियम व अटी आहेत परंतु सदर कामाच्या ठिकाणी हे नियम डावलून ठेकेदार मनमानी कारभार करताना दिसून येत आहे.