दौंड प्रतिनिधी : ता.०३ जाने २०२० (दिपक पवार)
मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती (ता.०३) रोजी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेने तसेच शासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नानगाव ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य व नागरिकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत महिलांचे हिमोग्लोबिन रक्त चाचणी यावेळी घेण्यात आली होती.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाळेतील मुलांना खेळण्यासाठी क्रांतीज्योती बालोद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.त्याचबरोबर हॅड वॉश स्टेशन व शाळेत सी सी टीव्ही कॅमेरेही लोकवर्गणी सहभाग व जिल्हा परिषद यांच्यामार्फत बसवण्यात आले आहे.
तनिष्का गुंड या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित वेशभूषा घालून एक नाटिका सादर केली.तसेच विष्णू खराडे यांनी विद्यार्थी वर्गाला आपल्या वकृत्व शैलीतून सखोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी या कार्यक्रमासाठी नानगाव ग्रामपंचायत सरपंच पुष्पा गुंड,माजी सरपंच सी बी खळदकर,उपसरपंच सुनिता रासकर,विशाल शेलार,विष्णू खराडे,राजेंद्र खोमणे,पोपट शेलार,कुलदीप गुंड,संजय रासकर,पोपट खळदकर,दिपक खळदकर,संतोष खळदकर,संदीप आहेरकर,व्ही.आर.पाटोळे,ए.आर. खळदकर,एस.बी.वेताळ,एस.टी.भोसले, आर.एस.सातकर व पालकवर्ग आणि शाळा व्यवस्थापन समीती आदि मान्यवर उपस्थित होते.