केडगाव मध्ये गुटखाविक्री व्यवसाय
फोफावतोय ?
केडगाव प्रतिनिधी
ता.०३ जाने २०२० [ भाग - ०१ ]
केडगाव ता.दौंड येथे
मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे.न्यायालयाने गुटखा विक्रीवर बंदी घातली
आहे.तरी देखील खुलेआम ही विक्री होत असते.
न्यायालयाच्या
निर्णयाला न जूमानता ही विक्री होत असते.केडगाव येथे गुटखा खरेदी करण्यासाठी
आसपासच्या गावातील दुकानदार येत असतात, त्यामध्ये बोरीपारधी,दापोडी,पारगाव,नानगाव,चौफुला,वरवंड,कडेठाण,हातवळण या गावतील दुकानदार येऊन गुटखा
खरेदी मोठ्या प्रमाणात करत असतात.
रोज सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास केडगावमध्ये गुटखा घेऊन येणारी
गाडी येत असते.रोज सकाळी हा गुटखा दोन तीन दुकानात खाली केला जातो.ही नित्याची बाब
झाली आहे.हे सर्व होत असताना पोलिस प्रशासनाला चाहुल कशी लागत नाही.हे नवलच
म्हणावे लागेल.
पोलिस प्रशासन नजरेतून
कोणतीच गोष्ट चुकत नाही.मग गुटखा विक्री करणारे कसे चुकले हा चर्चेचा विषय झाला
आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा केडगावमध्ये येऊन त्याची विक्री होते व गुटख्याची साठवनूक मोठ्या प्रमाणात होत असून देखील कारवाई होत नसल्याची चर्चा
सध्या सुरु आहे.
केडगाव बाजार पेठेतील एका दुकानात इतर वस्तु खरेदी करण्यापेक्षा
गुटखा खरेदी करणा-याची गर्दी जास्त असते. ते देखिल भरबाजार पेठेत व केडगाव-चौफुला रस्त्याच्या
कडेला किराणा मालाच्या दुकानात होत असते.