दौंड प्रतिनिधी : ता.१९ जाने
दौंड तालुक्यातील " दौंड आर्चरी स्पोर्ट असोसिएशन " च्या विद्यार्थ्यांची आणखी एक गरुड झेप "नॅशनल लेवल आर्चरी स्पर्धेकडे". कठोर मेहनत, जिद्ध व सातत्य याचा हा परिणाम म्हणून हे यश त्यांनी गाठले आहे .
येत्या 23 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित, स्थळ- Niketan Public School, Tehra, Agra, Uttar Pradesh येथे होणाऱ्या 9th FAAI's National Field-Indoor Archery Championship 2019-20 मध्ये दौंड मधील " दौंड आर्चरी स्पोर्ट असोसिएशन " चे विद्यार्थी पुष्कर तांबोळी, ओम नलवडे, कार्तिक गायकवाड, अक्षय सावंत, गौरी दळे, मनस्वी चव्हाण, राधिका चव्हाण, कृष्णा नय्यर व शुभम गुणवरे इत्यादी विद्यार्थ्यनची निवड झाली. व यामध्ये नुकतेच अंडर नाईन वयोगटामध्ये महाराष्ट्र स्टेट आर्चरी खेळून व टॉप रँकिंग मध्ये बसलेले 2 विद्यार्थी यांनी हे करून दाखवले आहे.
1.शॉर्य प्रवीण काळे 2. कृष्णा अजिनाथ गंभीरे हे देखील सहभागी आहेत. आणि यांना मार्गदर्शन लाभलेले सर्व शिक्षक श्री.मंगेश चव्हाण,शुभम जंबुरे, विशाल फसगे इत्यादी. ही आपल्या दौंड तालुक्यासाठी संमांजनक बाब आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या शिक्षकांना नॅशनल मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा व स्टेटलेवल ला खेळून आलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन यावेळी करण्यात आले.