पुणे प्रतिनिधी ता.०७ जाने २०२०
नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे.हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळकेचा 3-2 असा पराभव करुन,महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.
या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरने उपविजेता शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन खिलाडूवृत्ती दाखवत मैत्रीचं दर्शन घडवलं.दोस्तीत कुस्ती नाही,मात्र कुस्तीत दोस्ती नाही असं म्हटलं जातं.त्याची प्रचिती पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने पाहायला मिळालं. दोन्ही मल्ल हे काका पवार यांच्या तालमीतील आहेत.त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे.
विजयी हर्षवर्धन सदगीरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देण्यात आली.हर्षवर्धन सदगीर 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा मानकरी ठरला.