दौंड प्रतिनिधी : ता.०१ जाने
दौंड तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत संगणक परीचालक जवळपास 50 च्या आसपास आहे.हे ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत आहे.चार महीन्यापासून संगणक परीचालकांना मानधन अद्याप मिळाले नाही.आता या कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.
मानधन वाढीसाठी अनेक अंदोलने करण्यात आली आहे. महिन्याला सहा हजार मानधन दिले जाते.ते देखिल वेळेवर मिळत नसल्याने कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण वेळ काम असल्याने दूसरे देखिल काम करता येत नाही.त्यामूळे कूटुंब चालवायच कसा असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामपंचायत मधून आपले सरकार सेवाकेंद्र अंतर्गत एक लाख 20 हजार रुपयाचा चेक दिला जातो.तो जि.प.परीषदेकडे जमा केला जातो.नंतर तो csc कडे वर्ग केला जातो.
परंतु यामधून सहा हजार रुपये मानधन दिले जाते.व 6 हजार स्टेशनरी,देखभाल खर्च असतो. परंतु आता स्टेशनरी देखिल दिली जात नाही.
आता मायबाप सरकार याकडे लक्ष देणार का? आसा प्रश्न उपस्थित होत आहे.