केडगाव प्रतिनिधी : ता.२७ जाने
दापोडी ता.दौंड येथील गट नंबर 345/01 व 345/02 यामध्ये गायरान क्षेत्र आहे. या गायरान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.हे अतिक्रमण हटवणे बाबत (ता.२६) ग्रामसभेत ठराव मंजूर केला आहे.
या गायरान क्षेत्रात गावातील नागरिक कमी राहतात परंतु बाहेरील लोकांनी जागा बळकावून त्यावर बांधकाम केले आहे.आता या ठरावानुसार गायरान हटवणे बाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच अतिक्रमणात सर्रासपणे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.यामध्ये दारूविक्री,चंदन चोरी असे अनेक अवैध धंदे चालू असल्याची चर्चा ग्रामसभेमध्ये झाली. त्यावर दारूबंदी ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. गावात विठ्ठल मंदिराचे बांधकाम चालू आहे. त्यासाठी आमदार फंडातून 15 लाख रुपये निधी दिला आहे परंतु बांधकाम मोठ्या प्रमाणात असल्यानेनिधी कमी पडत असल्याने निधी जिल्हा परिषद सदस्य राणी शेळके यांनी सहा लाख रुपये निधी दिला आहे परंतु काही लोकांनी सांगितले की, आम्हाला हा निधी नको यांनी यावरून ग्रामसभेमध्ये गदारोळ निर्माण झाला या मुद्द्यावर हमरी-तुमरी सुद्धा झाली परंतु समिती स्थापन करण्याचा निर्णय तसाच राहिला गावाचे शिव मोजणी याबाबत चर्चा झाली यानंतर तसाच गोंधळ निर्माण झाल्याने अखेर सभा तहकूब करण्यात आली.
यावेळी सरपंच नंदा भांडवलकर व ग्रामसेविका थोरात व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस नाईक गोसावी पोलीस कॉन्स्टेबल रणदिवे निखिल हेही उपस्थित होते.