दौंड प्रतिनिधी : (ता.२३ जाने)
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वाहन चालकाला अमानुष मारहाण केल्याची घटना मंगळवार (ता.२१) रोजी घडली असून टोलच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर दिशेने पुणेकडे येताना वाहन चालक हेमंत सोनवणे (वय२३,रा.पाटस) टेम्पो घेऊन पाटसकडे येत असताना टोल प्लाझावर उपस्थित असलेले अधिकारी अजित सिंग व इतर दोन सहकाऱ्यांसोबत बाचाबाची झाली.याचे रूपांतर मारहाणीत झाल्याने टोलच्या तीन अधिकाऱ्यांनी स्थानिक वाहन चालकाला अमानुष मारहाण केली आहे.यावेळी या घटनेत वाहन चालक जखमी झाला असून अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान टोल व्यवस्थापक अजित सिंग, लेखराज सिंग, नीरज कुमार रमणीय या तीन आरोपींवर अदखल पात्र कलम ३२३ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस करत आहेत.या घटनेतील तीन आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.
पाटस टोल प्लाझाचे व्यवस्थापक अजित सिंग,लेखराज सिंग, नीरज कुमार रमणीय या तीन इसमांनी रक्तस्राव होईपर्यंत मारहाण केली आहे.तसेच संबंधितांवर दखलपात्र गुन्हाची नोंद करण्यास यवत पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे.तसेच वरिष्ठांनी याची दखल घेऊन तीन आरोपींवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात होती.
गुरुवार (ता.२३) रोजी पाटस ग्रामस्थांनी पाटस बंदचे आव्हान केल होते.त्यानुसार (ता.२३ जाने) रोजी दुपार पर्यंत गाव बंद ठेवण्यात आले होते व त्यानंतर गाव सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पाटस ग्रामस्थांना पोलिसांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे की योग्य ती कारवाई करण्यात येईल.यावेळी राजकीय व शासकीय पदाधिकारी यांनी यावेळी भेट देण्यात आली होती.