पारगाव प्रतिनिधी : ता.२० जाने २०२०
भैरवनाथ विद्यालय खुटबाव येथे वेलनेस ऍक्टिव्हिटी घेण्यात आली. दहावीच्या मुलांना परीक्षेला सामोरे जात असताना ताण तणाव विरहीत कसे जावे याबाबतचे मार्गदर्शन उल्हास मिसाळ यांनी केले.
मुलांना फक्त अभ्यास एके अभ्यास न सांगता कार्यशाळा घेऊन मुलांमध्ये चैतन्य निर्माण केले.विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठीचे प्रयत्न तर शिक्षक करत असतात परंतु त्यांना या कार्यशाळेच्या माध्यमातून विशेष दृष्टिकोन मिळाल्याचे समाधान विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेत भैरवनाथ विद्यालयाचे व अमोल मेमोरियल चे तब्बल दहावीचे 220 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक हिंदुराव जाधव, पर्यवेक्षक बाबासाहेब सरतापे, संजय पवार,भानुदास नेवसे, भाऊसो थोरात, रोहिणी थोरात, माधुरी चव्हाण आदी शिक्षकांनी सहकार्य केले. त्याचबरोबर हा उपक्रम संतराज कंप्यूटर खुटबाव यांच्यामार्फत आयोजित केला होता. विजय राऊत, सुधाकर बंड, नितीन साळवे, बापू नवले यांनी हा उपक्रम पार पाडण्यासाठी मदत केली.