केडगाव प्रतिनिधी : ता.०६ जाने २०२०
केडगाव-चौफुला रस्त्याच्या कडेला व केडगाव बाजार पेठेतील किरणा दुकानात असलेल्या डब्यात इतर मालाच्या वस्तू कमी मात्र गुटख्याचे पुडे जास्त पहावयास मिळत आहे.व स्टॉक मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती नावे न सांगण्याच्या अटीवर देण्यात आली आहे.
गुटख्याचे स्टॉक करून हे गुटखा किंग मोठ्या प्रमाणात विकत असतात.मग हे कुण्याच्या आशिवार्दाने चालू आहे.तेही भरपेठेत व केडगाव चौफुला रस्त्याला लगत जर न्यायालयाचे नियम झूगारुन चालत असेल तर याला काय म्हनावे ?
जर न्यायालयने गुटखा बंदीचा निर्णय घेतला असला तरी तालुक्यात गुट्खा येतो कुठून असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी केडगाव एस.जी.होलमाने यांनी सांगितले कि,गुटखा खान्यात आल्यावर तोंडाचा कॅन्सर,गळ्याचा कॅन्सर होऊ शकतो तसेच गुटख्यात निकोटींनचे प्रमाण जास्त असल्याने रक्त वाहिन्यावर त्याचा परिणाम हाऊ शकतो.हार्ट अॅटॅक देखिल होऊ शकतो.त्यामूळे असा शरीरावर परीणाम होत असेल तर या विक्रीवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत जूने जानकार व्यक्ती करु लागले आहे.
अन्न प्रशासन अधिकारी भुजबळ यानी सांगितले कि यापुर्वी आम्ही तालुक्यात गुटखा विक्री करण-यावर कारवाया केल्या आहेत.गुट्खा विक्री करण-यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करणार असल्याचे डी न्यजू लाइव्ह या वृत्तवाहिनीशी फोन द्वारे बोलताना सांगितले.