Saturday, February 1, 2020

चौफुला येथील रेणुका कलाकेंद्रातील नृत्यांगणावर प्राणघातक हल्ला !


केडगाव प्रतिनिधी ता.०१ फेब्रु २०२०

दौंड तालुक्यातील चौफुला येथील रेणुका कला केन्द्रामध्ये एका नृत्यांगणावर कोयत्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे.
 याबाबत आरोपी मनोज सखाराम उजागरे रा.पाटस ता.दौंड याच्यावर नृत्यांगणाच्या फिर्यादिवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार ता.३० जानेवारी रोजी रात्री 10: 30 वाजण्याच्या सुमारास रेणुका कला केंद्रातील खोलीमध्ये हि नृत्यांगणा एकटी बसलेली असताना तेथे अचानकपणे आरोपी येऊन तू मला आवडते म्हणून तू इतर कोणाहि पुरुषाशी बोलायचे नाही.वारंवार  सांगितले असताना, तू माझे ऐकत नाही असे म्हणून हुज्जत घालू लागला. मला नाचगाने करताना इतर पुरुषाशी बोलने भाग पडते असे म्हणताच अरोपीने नृत्यांगणावर हाताने लाथा बुक्यानी मारहाण करत कमरेचा धारदार कोयता काढून नृत्यांगणाच्या मानेवर पाठीवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
हल्यानंतर आता तुझ्या मुलाला व घरच्याना सुध्दा जीवे मारनार अशी धमकी देऊन त्या ठिकाणाहून निघुन गेला. जखमी नृत्यांगणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पुढील तपास यवत पोलिस करत आहे.