केडगाव प्रतिनिधी ता:१३ फेब्रु २०२०
दापोडी ता.दौंड येथे गेल्या पंधरा दिवसांपासून शेळ्या व म्हशीच्या चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
दापोडी येथील ताडगे वस्तीवर गोठ्यातील म्हशी पंधरा दिवसापुर्वी चोरीला गेली आहे. तसेच मांगोबाचे माळ येथील एका शेत मजुरांची म्हैश चोरीला गेली आहे.तसेच रस्त्याच्या कडेला असणा-या शेळ्या देखिल चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. अनेक दिवसापासून रस्त्याच्या कडेला असना-या शेळ्या व म्हशी चोरीला जात आहे.परंतू हे चोरीच सत्र थांबत नाही.
ज्या लोकांच्या म्हशी चोरीला गेल्या आहेत.त्यांची कींमत अंदाजे 50 हजार रुपयेच्या आसपास सांगीतले जात आहे. पाळत ठेवून म्हशी व शेळ्या चोरीला जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.जर जीवापाड जपलेले पाळीव प्राणी जर चोरीला जात असेल तर काय करावे असा प्रश्न निर्माण होत आहे.यामुळे शेतकरी वर्गाचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे.असा प्रयत्न अनेक वेळा आशा चो-या झाल्या आहेत.परंतू चोर सापडलेला नाही.त्यामुळे जनावरे चोरीला जात आहे. याकडे लक्ष देने गरजेचे आहे.