रांजणगाव गणपती (शिरूर) प्रतिनिधी : ता.२१ फेब्रु
रांजणगाव गणपती(ता.शिरुर) येथील हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी बारामती क्राईम ब्रांच च्या पथकाने टाकलेल्या धाडीत वेश्याव्यवसाय करणा-या पाच परप्रांतिय महिलांची सुटका केली तर सात आरोपींना अटक केल्याची माहिती बारामती क्राईम ब्रांच चे प्रमुख पोलीस निरीक्षक चद्रशेखर यादव यांनी दिली.
याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगाव येथील हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी बारामती क्राईम ब्रांच च्या पथकास स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी परप्रांतिय महिलांकडुन वेश्याव्यसाय करवुन घेतला जात असल्याची गोपनीय व खाञीशीर माहिती अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांना मिळाली होती.त्यानुसार,बारामती क्राईम ब्रांच चे प्रमुख चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस व क्राइम ब्रांच च्या संयुक्त पथकाने अचानक टाकलेल्या धाडीत हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल मुक्ताई येथे तीन परप्रांतीय महिला (पश्चिम बंगाल) व हॉटेल गारवा येथे दोन परप्रांतीय (पश्चिम बंगाल) महिला यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवुन घेताना आढळुन आल्या.यातील पाचही महिलांना सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.
तर या प्रकरणी महेश उर्फ बापुण, (रा.रांजणगाव) 2) सुमित साहू, (रा.रांजणगाव) 3) संदीप बळवंत येंधे, (रा.जुन्नर) 4) राजू पित्तवास साहू, (रा.ओडिसा),5) संतोष लोकनाथ बेहरा,(रा. ओडिसा), 6) नारायण संजय दुधाटे, (रा.परभणी), 7) राकेश उर्फ लूफताद रहमान शेख असे एकूण ७ आरोपींविरुद्ध रांजणगाव पोलीस स्टेशन ला अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,रांजणगावचे पोलीस निरीक्षक भारतकुमार राऊत,सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम,बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 9 पुरुष 2 महिला जवान पोलिस जवान यांनी तसेच-रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलिस जवान किशोर तेलंग, अजित भुजबळ, रघुनाथ हळनोर यांनी ही कारवाई केली.