Saturday, February 22, 2020

दौंड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार - आ.राहुल कुल


केडगाव प्रतिनिधी : ता.२२ फेब्रु २०२०

राज्यातील महा महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी दौंड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती  आमदार राहुल कुल यांनी शनिवारी चौफुला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 
 अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि फळबागांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे असे म्हणत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे  असा सवाल उपस्थित केला गेला.  
भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदत कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती, उपकरण, पशुपालन, शेळीपालन, मधमाशी पालन, अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता.