केडगाव प्रतिनिधी : ता. ०५|२|२०२०
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन कलावंतांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळाचे सदस्य व तमाशा थेटर मालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अशोक जाधव यांनी लावणी कलावंतांच्या समस्यांचे निवेदन दिल्यानंतर अमित देशमुख बोलत होते. यावेळी जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील तमाशा कलावंतांचे मानधन रखडले आहे तसेच ज्या लावणी कलावंतांना पेन्शन योजना लागू करण्यात आले आहे त्यांना ती वेळेवर मिळत नाही. वयोवृद्ध लावणी कलावंतांना सरकार दरबारी हेलपाटे मारणे शक्य होत नाही.त्यांना योग्य मानसन्मान दिला जात नाही. लावणी कलावंत वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना घरकुल योजनेतून सरकारी जागेवर घर बांधून देण्यात यावी काही ठिकाणी लावणी कलावंतांवर हल्ले केले जात असतात अशा हल्लेखोरांना शासन करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचीची मागणी देखील निवेदनात केली आहे.