पारगाव प्रतिनिधि : ता.१९ फेब्रु
इतर वस्तुची चोरी न करता "महत्वाची कागदपत्रे गायब" !
पारगाव ता.दौंड येथील डी न्यूज लाइव वृत्तवाहिनी व साप्ताहिक दौंड एक्सप्रेसचे मध्यवर्ती कार्यालय (ता.१८) रोजी रात्रीच्या सुमारास कार्यालयाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे.
एका वर्षापासून सुरु असलेले वृतवाहिनीचे कार्यालय व शेजारील दत्ता काळे यांचे दुकान ही चोरीटयांनी फोडले आहे.
सदर घटना ही गाळा मालक भानुदास शिंदे यांनी सकाळी आल्यानंतर पाहिली असता केडगांव पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पानसरे यांना संपर्क साधून या घटनेची माहिती कळवली आहे.
डी न्यूज वृतवाहिनीचे संपादक सचिन रूपनवर यांनी यावेळी सांगितले की,कार्यालयात इतर किमतीचे वस्तु उपलब्ध होत्या परंतु त्या चोरुन न घेऊन जाता महत्वाचे कागदपत्रे चोरटयांनी चोरुन नेले आहेत.
इतर वस्तु चोरी न करता महत्वाचे दस्तेवज चोरुन नेले आहे त्यामुळे नक्की चोरांचा उद्देश काय होता व हे चोरटे कुणाच्या सांगन्यावरुन आले होते हे अद्याप कळून आले नाही सदर घटनेची माहिती स्थानिक पोलिस चौकित दिली आहे अशी माहीत रूपनवर यांनी दिली आहे.
पारगाव येथे अवैध धंद्यात वाढ झाली असून वाळू उपसा करणारे परप्रांतीय,गुरहाळ घरात काम करणारे मजूर असे अनेक बाहेरील लोक येथे वातव्यास आले आहेत त्यांची कुठेही नोंद नसल्यामुळे चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात येत असून पोलिस प्रशासनाने याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व दूकानदारानी केली आहे.