दौंड प्रतिनिधी : ता.०४ जाने २०२०
आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.शुभांगी धायगुडे-शिंगटे व सर्व सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दौंड शहरातील भोईटे नगर परिसरातील महिलांसाठी तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा वाई जि.सातारा व महालक्ष्मी कोल्हापूर या ठिकाणी देवदर्शन सहल आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहलीला जाण्यासाठी सहभाग घेतला होता.ज्या दिवशी सूर्य महोत्सव होता.त्या दिवशी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सूर्याच्या किरणानी एकदा महालक्ष्मीच्या पदस्पर्श दर्शनाने घेतल्याचे पाहून सहलीला आलेल्या महिलांनी आनंद व समाधान व्यक्त केले.