Wednesday, February 5, 2020

कुरकुंभ येथे हेन्केलने सुरु केला अत्याधुनिक कारखाना !


भारतात नवीन मल्टी-टेक प्लांटचा शुभारंभ !

विकासाच्या विपुल संधी उपलब्ध असलेल्या बाजारपेठांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमतांचा विस्तार !

डी न्यूज लाइव टीम  : ता.०५ जाने २०२०

 हेन्केल एजी अँड कंपनी केजीएएची संपूर्ण मालकीची उपकंपनी हेन्केल ऍडहेसिव्हस् टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आज पुण्यानजीक कुरकुंभ येथे आपला नवीन कारखाना (ता.०५) रोजी सुरु करण्यात आला आहे. जवळपास ५० मेऊर (४०० कोटी रुपये) गुंतवणुकीसह उच्च दर्जाची ऍडहेसिव्हस्, सिलंट्स आणि पृष्ठभाग प्रक्रिया उत्पादनांसाठी भारतातील उद्योगक्षेत्राच्या सातत्याने वाढत असलेल्या मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे.  हेन्केल कुरकुंभ उत्पादन कारखान्याचे औपचारिक उदघाटन ५ फेब्रुवारी २०२० रोजी करण्यात आले.  यावेळी मुंबईतील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे कॉन्सुल जनरल डॉ. युर्गन मोर्हर्ड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाचे सीईओ डॉ. पी. अनबलगन यांच्यासहीत अनेक मान्यवर उपस्थित होते.

तब्बल १,००,००० चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेल्या ५१,००० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला हा भारतातील सर्वात मोठा ऍडहेसिव्हस् उत्पादन कारखाना आहे.  विविध प्रकारे वापरता येतील अशी पॅकेजिंग्स, ऑटोमोटिव्ह, शेती व बांधकामाची उपकरणे, इतर उद्योग आणि धातू अशा विविध मार्केट्सच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हेन्केलच्या क्षमता वाढवण्यात हा नवीन कारखाना मोलाची भूमिका बजावेल.

हेन्केल एजी अँड कंपनी, केजीएएच्या ऍडहेसिव्ह टेक्नॉलॉजीज बिझनेस युनिटचे मॅनेजमेंट बोर्ड सदस्य आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट यान-डर्क ऑरिस यांनी सांगितले, "अतिशय महत्वाच्या, वेगाने विकसित होत असलेल्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतामध्ये ऍडहेसिव्हस् व्यवसायासाठी प्रचंड विकास संधी उपलब्ध आहेत."  ते पुढे म्हणाले, "जगभरातील सर्व उत्पादन उद्योगातील ऍप्लिकेशन एक्स्पर्टस आमच्याकडे आहेत.  आमची आमच्या ग्राहकांच्या तसेच भागीदारांच्या गरजा नीट समजून घेऊन त्यानुसार काम करतो.  ४० टेक्नॉलॉजीजच्या आमच्या अतुलनीय पोर्टफोलिओवर आधारित आमची अतिशय विश्वसनीय आणि आघाडीची उत्पादने व ब्रँड्स आमच्या ग्राहकांसाठी शाश्वत मूल्य निर्माण करत आहेत.  या अत्याधुनिक, मल्टी-टेक्नॉलॉजी कारखान्याची सुरुवात करून या वेगाने वाढत आणि बदलत असलेल्या मार्केटमध्ये आमच्या प्रभावी, उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी असलेली प्रचंड मागणी पूर्ण करण्याची क्षमता आम्ही निर्माण केली आहे. या गुंतवणुकीमुळे आम्हाला भविष्यकाळात लाभदायक वाढ करणे शक्य होणार आहे."   

उत्पादनांमध्ये अंगभूत गुणवत्ता निर्माण करून संपूर्ण उत्पादन प्रक्रिया पारदर्शक असावी यासाठीचे तंत्रज्ञान या कारखान्यामध्ये उपलब्ध करवून देण्यात आले आहे.  प्लांट ऑपरेशन्सचे  सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिजिटलायझेशन करण्यात आल्यामुळे उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम झाल्या आहेत.  यामध्ये क्लोज्ड मटेरियल हँडलिंग सिस्टिम्स आणि उच्च स्तराचे प्रोसेस ऑटोमेशन वापरण्यात आले आहे.  हेन्केलमध्ये जागतिक स्तरावरील चाचणी म्हणून पहिल्यांदाच या कारखान्यात स्मार्ट फॅक्टरी (इंडस्ट्री ४.०) सोबत प्रोसेस ऑटोमेशनचा सर्व ठिकाणी अंतर्भाव करण्यात आला आहे.

कुरकुंभ कारखान्यामध्ये पर्यावरण संवर्धन, संरक्षणाच्या उच्चतम मापदंडांचे पालन करण्यात आले आहे.  यूएस ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून सर्वसमावेशक ऊर्जा सक्षमतेच्या संकल्पनेवर आधारित एलईईडी गोल्ड सर्टिफिकेट देण्यात आलेल्या अगदी मोजक्या केमिकल मॅन्युफॅक्चरिंग साईट्समध्ये या कारखान्याचा समावेश आहे.  या कारखान्याला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी जवळपास १०% गरज सौर ऊर्जेतून भागवली जाते. शाश्वत ऊर्जेचा वापर वाढवत नेण्याची कंपनीची योजना आहे.  या कारखान्याला संपूर्ण वर्षभरात लागणार असलेल्या एकूण पाण्यापैकी जवळपास १६% पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगमार्फत उपलब्ध केले जाणार आहे.  हवा तसेच सांडपाण्याची व्यवस्था यावर ऑनलाईन लक्ष  ठेवले जात आहे.

हेन्केल इंडियाचे प्रेसिडेंट शिलिप कुमार यांनी सांगितले, "स्थानीय पातळीवर उत्पादनामुळे भारतातील आमच्या ऍडहेसिव्ह टेक्नॉलॉजीज व्यवसायाला धोरणात्मक लाभ मिळतील त्यामुळे या क्षेत्रात आम्ही सातत्याने गुंतवणूक करत राहू.  भारतात हेन्केलच्या प्रवासात कुरकुंभ कारखाना हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.  या कारखान्यातून भारतीय बाजारपेठांबरोबरीनेच मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशिया यासारख्या भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या बाजारपेठांना देखील उत्पादने पुरवली जातील.  या  उद्योगक्षेत्रातील मार्केट लीडर या नात्याने आमच्या ग्राहकांना प्रभावी उत्पादने पुरवणे आणि बाजारपेठेतील संधींचे रूपांतर लाभकारी प्रगतीमध्ये करण्यावर आमचा मुख्य भर असेल."

हेन्केल ऍडहेसिव्ह टेक्नॉलॉजीज ही ऍडहेसिव्हस्, सिलंट्स आणि फंक्शनल कोटिंग्स या उद्योगक्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी आहे.  ८०० पेक्षा जास्त उद्योगांमधील जवळपास १,३०,००० ग्राहकांच्या मागण्या हे बिझनेस युनिट पुरवते.  ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार बनवण्यात आलेली उत्पादने आणि तंत्रज्ञान यांचा वापर विविध प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू तसेच औद्योगिक उत्पादनांमध्ये केला जातो.