कुरकुंभ प्रतिनिधी : ता.०३ जाने २०२०
विविध माण्यवरांचा पुरस्कार गुणगौरव सोहळा !
रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रोजी इंदापूर येथे जोतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माळी समाज नव वधू- वर व पालक परिचय मेळावा व माळी समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असुन रविवारी संपन्न होणारा १५ वा माळी मेळावा असल्याची माहीती मुख्य आयोजक सुधाकर बोराटे यांनी इंदापूर येथे बोलताना दीली.
राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावीत्रीबाई जोतीराव फुले यांचे जयंती निमित्त जोतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माळी समाज नव वधू - वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन इंदापूर येथील शहा सास्कृतीक भवन येथे रविवार दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक १:३० वाजता करण्यात आले असुन यामध्ये विवाह इच्छुक नव वधू- वर, विधवा, विधूर,व घटस्फोटीत यांनाही सहभागी होऊन इच्छित स्थळ मिळण्यासाठी नाव नोंदणी करता येइल.मेळाव्यास येताना वधू-वरांनी स्वत:चा संपूर्ण माहिती बायोडाटा व एक आय कार्ड साइज फोटो आणावा. सोबत पालकांसह मेळावा सुरू होण्याच्या अर्धातास अगोदर उपस्थित रहावे.
त्याचबरोबर जोतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे सन.२०१९ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर झाले असुन माळी समाजात विविध सामाजिक, राजकिय, शैक्षणीक,कला,वाणीज्य व विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्यांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे.यामध्ये पूणे जिल्हा परिषद सदस्य व पूणे जिल्हा शिक्षण व क्रिडा समिती सदस्य, सागर मल्हारी भोसले. (माळी युवा समाजरत्न), कर्जत नगर पंचायत नगरसेवक व सावता परिषद महाला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ.मनिषाताई सचिन सोनमाळी यांना (माळी समाजरत्न),इंदापूर पंचायत समितीचे मा.सदस्य व मा.ग्रामविकास अधिकारी निवृृत्ती भिकू गायकवाड (माळी समाज जिवन गौरव), व कुरकुंभ ग्रामपंचायत माजी सरपंच सौ.जयश्री संदिप भागवत (माळी समाज गौरव) पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार असुन माळी समाजातील इच्छुक नव वधू-वर यांनी अधिक माहीतीसाठी मुख्य आयोजक सुधाकर बोराटे (9561190332) याचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
——————————————————