केडगांव प्रतिनिधि : ता.०६ जाने
नानगांव ता.दौंड मधील गुंडवस्ती येथील काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी 25/15 या निधीमधून अंदाजे 18 लक्ष रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या साइड पट्या तीन ते चार फूट उंचीची आहेत.याठिकाणी ट्रॅक्टर,दुचाकी,शाळेत जाणारे विद्यार्थी त्याठिकाणी घसरून खाली पडले आहेत व किरकोळ जखमी झाले आहेत.
भविष्यात याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अशी माहिती स्थानिक ग्रामस्थ राहुल गुंड यांनी दिली आहे. लवकरात लवकर मुरूम टाकून या साइडपट्या भरण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.