केडगाव प्रतिनिधी : ०६|०२|२०२०
नानगाव ता.दौंड येथील स्मशानभूमी हद्दीतील रस्त्याच्या कडेला असलेल्या शंकराच्या मंदिरामध्ये अक्षय सुरेश खळदकर वय वर्ष 22 राहणार नानगांव तालुका दौंड जिल्हा पुणे यास सापळा लावून पकडले आहे. त्याच्याजवळ कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल व खिशामध्ये दोन पितळे जिवंत काडतुस त्याची किंमत बावीस हजार रुपये आंदाजे आहे.त्यामुुुुळे त्याच्या विरुद्ध गजानन खत्री यांनी फिर्याद दिली आहे.
या गुह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करीत आहेत.सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मिना तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा व बी एन पाटील पोलीस निरीक्षक यवत यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक पानसरे पोलीस हवालदार,कदम पोलीस नाईक,आर आर गोसावी पोलीस कॉन्स्टेबल व गजानन खत्री यांनी केली आहे.