Wednesday, January 29, 2020

राहू | वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडले !



राहू प्रतिनिधी : ता.२९ जाने २०२०

 राहु ता.दौंड येथील मुख्य चौकाजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडले असून या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
याबाबत रात्री उशिरापर्यंत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
वाघोली कडून राहुच्या दिशेनेच जात असलेल्या स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच 19 डि. एम. 5847 वरून दोघे जण प्रवास करत होते.पाठीमागून येत असलेल्या वाळू वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच 14 इ.एम 8865 ने दुचाकीला धडक दिली.

 या धडकेने दुचाकीवरील दोघेही ट्रकखाली  चिरडले गेल्याने शिवाजी बाबु चव्‍हाण वय 40 राहणार पाथरे चाळीसगाव व गोकुळ लक्ष्मण राठोड वय 40 राहणार तळंदे चाळीसगाव यांचा जागीच मृत्यू झाला.
मात्र ट्रक ड्रायव्हर तेथून ट्रक घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

परिसरातील ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पिंपळगाव येथील आवाळे वस्ती नजीक पकडले.
 याबाबतची खबर पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांनी यवत पोलिस ठाण्यात दिल्यानंतर यवत पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने या ठिकाणी दाखल झाले.
दोन्ही मृतदेह त्यांनी ताब्यात घेत ट्रक ड्रायव्हर व ट्रक  देखिल ताब्यात घेतला. याबाबतचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.याचा पुढील तपास यवत पोलिस करत आहे.

Tuesday, January 28, 2020

वरवंड | कुसुम सरणोत यांच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली !

केडगाव प्रतिनिधी : ता.२९ जाने २०२०

वरवंड ता.दौंड येथील स्वर्गीय श्रीमती कुसुम बाई पोपटलाल सरणोत वय वर्षे ८५ सकाळी सात वाजता त्यांचे दुःखद निधन झाले आहे.
तसेच त्यांच्या परिवाराने नेत्रदानाचा निर्णय घेतला आणि एक मित्र एक वृक्ष या संघटनेशी संपर्क करून नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली.
नेत्र तज्ञ डॉ.प्रेमकुमार भट्टड, डॉ.विजय दिवेकर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.बनसोडे व एक मित्र एक वृक्ष संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली वरवंड येथील तिसरे नेत्रदान पार पडले आहे.
एक मित्र एक वृक्ष ही सामाजिक संस्था दौंड तालुक्यात नेत्रदान व वृक्ष लागवड या संदर्भात चांगले उपक्रम राबवत असतात.
या ग्रुपचे हे २१ वे नेत्रदान होते. त्यांच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली व स्वर्गिय कुसुमबाई नेत्ररूपी अमर झाल्या आहेत.
मागील वर्षी या परिवारातील  स्व.राजेंद्र सरनोत यांनी नेत्रदान केले होते.
कुसुम बाई यांच्या अंत्ययात्रेत नेत्रदान जनजागृती व्हावी म्हणून नेत्रदान करा,सर्व श्रेष्ठ दान नेत्रदान असे संदेश देणारे फलक तयार केले होते.

नेत्र तज्ञ डॉक्टर प्रेम कुमार भट्टड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून डोळे नेत्र पिढीला पुण्याला पाठविले आहेत.

Monday, January 27, 2020

दापोडी येथील ग्रामसभेत हमरी-तुमरी !


केडगाव प्रतिनिधी : ता.२७ जाने 

दापोडी ता.दौंड येथील गट नंबर 345/01 व 345/02 यामध्ये गायरान क्षेत्र आहे. या गायरान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.हे अतिक्रमण हटवणे बाबत (ता.२६) ग्रामसभेत ठराव मंजूर केला आहे.
 या गायरान क्षेत्रात गावातील नागरिक कमी राहतात परंतु बाहेरील लोकांनी जागा बळकावून त्यावर बांधकाम केले आहे.आता या ठरावानुसार गायरान हटवणे बाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच अतिक्रमणात सर्रासपणे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.यामध्ये दारूविक्री,चंदन चोरी असे अनेक अवैध धंदे चालू असल्याची  चर्चा ग्रामसभेमध्ये झाली. त्यावर दारूबंदी ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. गावात विठ्ठल मंदिराचे बांधकाम चालू आहे. त्यासाठी आमदार फंडातून 15 लाख रुपये निधी दिला आहे परंतु बांधकाम मोठ्या प्रमाणात असल्यानेनिधी कमी पडत असल्याने निधी जिल्हा परिषद सदस्य राणी शेळके यांनी सहा लाख रुपये निधी दिला आहे परंतु काही लोकांनी सांगितले की, आम्हाला हा निधी नको यांनी यावरून ग्रामसभेमध्ये गदारोळ निर्माण झाला या मुद्द्यावर हमरी-तुमरी सुद्धा झाली परंतु समिती स्थापन करण्याचा निर्णय तसाच राहिला गावाचे शिव मोजणी याबाबत चर्चा झाली यानंतर तसाच गोंधळ निर्माण झाल्याने अखेर सभा तहकूब करण्यात आली.
यावेळी सरपंच नंदा भांडवलकर व ग्रामसेविका थोरात व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस नाईक गोसावी पोलीस कॉन्स्टेबल रणदिवे निखिल हेही उपस्थित होते.

Sunday, January 26, 2020

डाळिंब | दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात दिवसा-ढवळ्या अवैध वाळू तस्करी !


यवत प्रतिनिधी दि 26

दौंड तालुक्यातील पश्चिम पट्यातील डाळींब (ता दौंड ) दिवसाढवळ्या अवैध वाळू तस्करी जोमात सुरू असून गेल्या अनेक महिन्यापासून बेकायदेशीर चोरी चालु आहे, महसुल विभागाच्या आशीर्वादाने पंधरा ते पंचवीस फूट खोल जमिनीत अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे,हजारो ब्रास वाळू उपसा करण्यात  येत असल्याची माहीती स्थानिक ग्रामस्थांनी दिली,या कडे मात्र महसुल अधिकारी  दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे मात्र संबंधित महसुलच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल असुन कारवाई कधी होणार हा प्रश्न जनतेमधुन होत आहे.

रात्रीचे सात वाजले कि वाळूची ट्रक भरली जाते,रात्रभर वाहतुक केली जाते दिवस उजेडला कि बंद असे गेले चार महीन्यापासुन चालु असुन या ठिकाणी रात्रीच्या वेळी ट्रकंचा आवाज व ट्र्कटर च्या आवाजाने नागरिक त्रास्त झाले आहेत, काही गावागावातील  वस्तीकडे येणारा रोड खचला गेला आहे.

या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन झाले, तालुक्याच्या पश्चिम  पट्यात  दिवसाढवळ्या वाळू तस्करी केली जात असुन स्थानिक महसुल अधिकारी कारवाई करत नसल्याने मलिदा कुठपर्यंत पोहचतो ? असा सवाल उपस्थित होत आहे,ज्या शेतामध्ये वाळू काढले गेले आहे त्या ठीकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे, ओढ्या लगत वाळू काढण्याचे प्रमाण चालु आहे, ज्या ठिकाणी ओढा असेल त्या ठिकाणी पुढे पाणी येणे आवघड झाले आहे.
अनधिकृतपणे करण्यात येत असलेल्या या वाळू उपश्यामुळे शासनाचा महसुल बुडत असला तरी अधिकारी मात्र शांत का ? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे,उपसा करणाऱ्या तस्करांचे अधिकार्यांशी लागेबांधे असल्याने महसुल विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यास धजावत नसल्याची परिस्थिती आहे, या परिसरातील असे अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी वाळू तस्करी चालु आहे, आता कारवाई कोन करनार हे महत्वाचे ठरणार आहे, या बाबत यवत चे सर्कल कोकरे यांना  संपर्क साधला असता त्यांचा शी संपर्क होऊ शकला नाही .

Thursday, January 23, 2020

पाटस | टोल प्लाझा अधिकाऱ्यांची तरुणाला बेदम मारहाण ; पाटस गावाची बंदची हाक !


दौंड प्रतिनिधी :  (ता.२३ जाने)

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वाहन चालकाला अमानुष मारहाण केल्याची घटना मंगळवार (ता.२१) रोजी घडली असून टोलच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर दिशेने पुणेकडे येताना वाहन चालक हेमंत सोनवणे (वय२३,रा.पाटस) टेम्पो घेऊन पाटसकडे येत असताना टोल प्लाझावर उपस्थित असलेले अधिकारी अजित सिंग व इतर दोन सहकाऱ्यांसोबत बाचाबाची झाली.याचे रूपांतर मारहाणीत झाल्याने टोलच्या तीन अधिकाऱ्यांनी स्थानिक वाहन चालकाला अमानुष मारहाण केली आहे.यावेळी या घटनेत वाहन चालक जखमी झाला असून अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान टोल व्यवस्थापक अजित सिंग, लेखराज सिंग, नीरज कुमार रमणीय या तीन आरोपींवर अदखल पात्र कलम ३२३ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस करत आहेत.या घटनेतील तीन आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.

पाटस टोल प्लाझाचे व्यवस्थापक अजित सिंग,लेखराज सिंग, नीरज कुमार रमणीय या तीन इसमांनी रक्तस्राव होईपर्यंत मारहाण केली आहे.तसेच संबंधितांवर दखलपात्र गुन्हाची नोंद करण्यास यवत पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे.तसेच वरिष्ठांनी याची दखल घेऊन तीन आरोपींवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात होती.

गुरुवार (ता.२३) रोजी पाटस ग्रामस्थांनी पाटस बंदचे आव्हान केल होते.त्यानुसार (ता.२३ जाने) रोजी दुपार पर्यंत गाव बंद ठेवण्यात आले होते व त्यानंतर गाव सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पाटस ग्रामस्थांना पोलिसांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे की योग्य ती कारवाई करण्यात येईल.यावेळी राजकीय व शासकीय पदाधिकारी यांनी यावेळी भेट देण्यात आली होती.

Sunday, January 19, 2020

खुटबाव | ताण तणाव विरहीत परीक्षेला सामोरे जा - उल्हास मिसाळ



पारगाव प्रतिनिधी : ता.२० जाने २०२०
भैरवनाथ विद्यालय खुटबाव येथे वेलनेस ऍक्टिव्हिटी घेण्यात आली. दहावीच्या मुलांना परीक्षेला सामोरे जात असताना ताण तणाव विरहीत कसे जावे याबाबतचे मार्गदर्शन उल्हास मिसाळ यांनी केले. 

 मुलांना फक्त अभ्यास एके अभ्यास न सांगता कार्यशाळा घेऊन  मुलांमध्ये चैतन्य निर्माण केले.विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठीचे प्रयत्न तर शिक्षक करत असतात परंतु त्यांना या कार्यशाळेच्या माध्यमातून विशेष दृष्टिकोन मिळाल्याचे समाधान विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. 

या कार्यशाळेत भैरवनाथ विद्यालयाचे व अमोल मेमोरियल चे तब्बल दहावीचे 220 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक हिंदुराव जाधव, पर्यवेक्षक बाबासाहेब सरतापे, संजय पवार,भानुदास नेवसे, भाऊसो थोरात, रोहिणी थोरात, माधुरी चव्हाण आदी शिक्षकांनी सहकार्य केले. त्याचबरोबर हा उपक्रम संतराज कंप्यूटर खुटबाव यांच्यामार्फत आयोजित केला होता. विजय राऊत, सुधाकर बंड, नितीन साळवे, बापू नवले यांनी हा उपक्रम पार पाडण्यासाठी मदत केली.

Saturday, January 18, 2020

दौंड तालुक्यातील विद्यार्थ्यांची आणखी एक गरुड झेप !


दौंड प्रतिनिधी : ता.१९ जाने
दौंड तालुक्यातील " दौंड आर्चरी स्पोर्ट असोसिएशन " च्या विद्यार्थ्यांची आणखी एक गरुड झेप "नॅशनल लेवल आर्चरी स्पर्धेकडे". कठोर मेहनत, जिद्ध व सातत्य  याचा हा परिणाम म्हणून हे यश त्यांनी गाठले आहे .
  येत्या 23 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित,  स्थळ- Niketan Public School, Tehra, Agra, Uttar Pradesh येथे होणाऱ्या 9th FAAI's National Field-Indoor Archery Championship 2019-20  मध्ये दौंड मधील " दौंड आर्चरी स्पोर्ट असोसिएशन " चे विद्यार्थी पुष्कर तांबोळी, ओम नलवडे, कार्तिक गायकवाड, अक्षय सावंत, गौरी दळे, मनस्वी चव्हाण, राधिका चव्हाण, कृष्णा नय्यर व शुभम गुणवरे इत्यादी विद्यार्थ्यनची निवड झाली. व यामध्ये नुकतेच अंडर नाईन वयोगटामध्ये  महाराष्ट्र स्टेट आर्चरी खेळून व टॉप रँकिंग मध्ये बसलेले 2 विद्यार्थी यांनी हे करून दाखवले आहे.
 1.शॉर्य प्रवीण काळे 2. कृष्णा अजिनाथ गंभीरे हे देखील सहभागी आहेत. आणि यांना मार्गदर्शन लाभलेले सर्व शिक्षक श्री.मंगेश चव्हाण,शुभम जंबुरे, विशाल फसगे इत्यादी. ही आपल्या दौंड तालुक्यासाठी संमांजनक बाब आहे.
   या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या शिक्षकांना नॅशनल मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा व स्टेटलेवल ला खेळून आलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन यावेळी करण्यात आले.

Thursday, January 16, 2020

राजगृह ग्रंथालयास शेख बंधूकडून १३९ पुस्तके भेट !


केडगाव प्रतिनिधी : ता.१६ जाने २०२०

पारगाव ता.दौंड येथील राजगृह ग्रंथालय या ठिकाणी पुस्तक भेट सोहळा (ता.१६) रोजी पार पडला.
राजगृह ग्रंथालयांस गजलकर  ए.के.शेख आणि त्यांचे बंधू कवि युनूस शेख यांनी ग्रंथालयास एकूण १३९ पुस्तके यावेळी भेट दिली.

यावेळी कार्यक्रमास सयाजी ताकवणे (विद्यमान पं.समिती सदस्य),पोपट ताकवणे (माजी दौंड तालुका अध्यक्ष आय कॉग्रेस),संभाजी ताकवणे(मा.उपसरपंच ग्रा.पं.पारगाव),सुभाष बोत्रे(मा.चेअरमन खरेदी विक्री संघ),पांडुरंग भांडळे,चांदभाई मणियार (अल्पसंख्याक अध्यक्ष दौंड तालुका),राजाभाऊ बोत्रे (मा.तंटामुक्ती अध्यक्ष पारगाव),कवि युनुसभाई शेख,डॉ.सागर शिंदे,डॉ.सुजाता शिंदे,दशरथ बोत्रे (मा.चेअरमन भि.पा.पु पारगाव),राजेंद्र आढगळे,रजनीकांत वनशिव,अमर वनशिव (अध्यक्ष दौंड तालुका),विजयराव वनशिव (सल्लागार रमाई वधु वर सूचक केंद्र) व आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवराचे स्वागत ग्रंथालयाचे अध्यक्ष अमर वनशिव यांनी केले तसेच विजय वनशिव यांनी आभार मानले.यावेळी युनूसभाई शेख यांचा ग्रंथालया तर्फे सत्कार करण्यात आला.

Wednesday, January 15, 2020

प्रहार जनशक्ती या पक्षाची दौंड तालुका कार्यकारिणी जाहीर !



यवत प्रतिनिधी  : (ता.१६ जाने २०२०) प्रहार जनशक्ती या पक्षाची दौंड तालुका कार्यकारिणी पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र जाधव यांनी नुकतीच जाहीर केली आहे या निवडी कार्यकारिणीमध्ये दौंड तालुक्यातील सर्व विभागाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. कार्यकारिणी या प्रमाणे रवींद्र जाधव दौंड तालुका अध्यक्ष, आप्पासो रांधवण कार्याध्यक्ष, संदीप सोनवणे उपाध्यक्ष ,महादेव चौधरी सचिव, गोरख सुतार सरचिटणीस, रमेश होलम संघटक, शरद गायकवाड संपर्कप्रमुख, भाऊसाहेब कदम समन्वयक. 
या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव म्हणाले आमचा तालुक्यामध्ये नवीन पक्ष असला तरी आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही लोकांच्या फायद्याचे प्रश्न असतील तेथे आमचा पाठिंबा राहील. समाजकारण अगोदर केले जाईल .चुकीचे काम असेल तर विरोध करणार म्हणजे करणार. अन्याय होऊ देणार नाही. पक्षाचे अध्यक्ष मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली जाईल. खडकवासला धरणातील पाण्याबाबत ही शेतकर्‍यांच्या बाजूने आवाज उठवला जाईल.

Tuesday, January 14, 2020

पारगाव येथे गॅस पाईपलाईन व ऑपटीकल फायबर केबलला ग्रामस्थांचा विरोध !


भाग - ०१
दौंड प्रतिनिधी : ता.१४ जाने २०२०
दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत गॅस पाईपलाईनचे काम सध्या चालू झाले आहे.हे काम न्हावरा ता.शिरूर या बाजूने चाफुला ता.दौंड या दिशेने सुरु झाले आहे.हे काम नियमात नसून,सर्व नियम धाब्यावर बसवून काम सध्या सुरुच आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतालगत असणार्या पाईप लाईन या खोद्कामामुळे उध्वस्त होऊ लागल्या आहेत.याबाबतची कल्पना शेतकरी व ग्रामपंचायतला दिली नसून,कंत्राटदार मनमानी करून काम करत आहे.अशी माहिती माजी उपसरपंच संभाजी ताकवणे यांनी दिली आहे.संबधित कामगारांना कागदपत्रांची मागणी केल्यास,उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.व दबक्या आवाजात नागरिकांकडून बोलले जात आहे कि, कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची अशी चर्चा आहे.

रस्त्याच्या बाजूने व रस्ता क्रॉस करून भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटर अंतरावर किंवा उपलब्ध रस्त्याच्या हद्दीलगत जमीन खोदून जमिनीच्या पृष्ठभागापासून १.२० मीटर पेक्षा जास्त खोलीवर टाकण्यात यावी. गॅस पाईपलाईन ही अस्तित्वातील रस्त्यावरील मोर्या,लहान पूल व मोठे पूल यांच्यावरून किंवा त्यांच्या लगत टाकू नये.सदरील काम करताना वाहतूक सुरक्षेतेच्या दृष्टीने खोदाई सुरु करण्यापूर्वी पूर्ण ५०० मिटर लांबीत बॅरीकेडस व सूचना फलक उभारण्यात यावे अशा नियम व अटी आहेत परंतु सदर कामाच्या ठिकाणी हे नियम डावलून ठेकेदार मनमानी कारभार करताना दिसून येत आहे.

Sunday, January 12, 2020

खानोटा | पुणे ग्रामीण पोलिसांची अवैधरित्या वाळू उपश्यावर मोठी कारवाई !



दौंड प्रतिनिधी : ता.१२ जाने २०२०

दौड पोलीस स्टेशन हद्दीत दौड तालुक्यातील खानोटा येथे भीमा नदीच्या  पात्रातून वाळू उपश्याची कोणतीही परवानगी नसताना अवैध रित्या वाळू उपसा करून त्या वाळूची चोरी करीत आहे. अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती वरून खालील नमूद अधिकारी आणि पोलीसजवान यांनी नियोजन करून दौड तालुक्यातील खानोटा भीमा नदी येथे , जयंत मीना व चंद्रशेखर यादव यांनी नियोजन करून मध्ये अधिकारी व जवान यांनी सदर ठिकाणी अचानक छापा मारला आसताना सुमारे ५८ लाख रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच १४ आरोपीन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अटक ७ जणांना करण्यात आली आहे.या प्रकणी दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, छुप्या पद्धतीने काही ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत. आशी माहिती गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते. व सदर कामगिरी ही संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.
मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार विशाल जावळे, अजिंक्य कदम, बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच आरसीपी पथकातील १४ पोलिस जवान यांनी कामगिरी केली आहे. तसेच-भिगवण पो स्टे चे psi रियाझ शेख पोलीस जवान संदीप कारंडे, पोमने, शिंदे, काळभोर दौड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, psi मोहिते, पोलीस जवान मलगुंडे, काळे, दुधाळ, बोऱ्हाडे यांचे सहकार्य मिळाले.
तसेच महसूल विभागातील मंडळ अधिकारी श्री मंगेश नेवसे आणि तलाठी  जयंत भोसले, दीपक पांढरपट्टे, यादव कोतवाल अशोक भोसले यांनी कारवाईत सहभाग घेऊन
यांनी केली आहे. व छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1) 42,00,000 रू/- 7 फायबर बोटी प्रत्येक बोटीची किंमत सहा लाख रुपये अशी एकूण
2) 16,00,000 /- रु च्या 8 लहान लोखंडी बोटी त्यामध्ये वाळू काढण्याची इंजन त्याची प्रत्येकी किंमत दोन लाख रुपये अशी एकूण 58,00,000 रु चा मुद्देमाल भीमा नदीपात्रातून जप्त करण्यात आला आहे व ते जागीच नाश करण्यात आले आहे.तसेच १४ आरोपीन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अटक ७ जणांना करण्यात आली आहे पुढील तपास दौड पो स्टे पो स्टे करीत आहे तसेच महसूल विभागातील मंडळ अधिकारी मंगेश नेवसे आणि तलाठी जयंत भोसले, दीपक पांढरपट्टे, यादव कोतवाल अशोक भोसले यांनी कारवाईत सहभाग घेऊन पोलीसांना मदत केली.

पाटस टोल प्लाझा वर रस्ता सुरक्षा अभियान २०२० !




पाटस प्रतिनिधी ता : १२ जाने २०२०
पाटस टोल नाक्यावर (ता.११)  रोजी दुपारी १२ ते ०१ च्या दरम्यान ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान उदघाटन सोहळा घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमाची सुरुवात वाहन चालक यांच्यासाठी नेत्र तपासणी शिबिराद्वारे करण्यात आली.त्यानंतर वाहन चालाकाना वाहतूक नियमावलीची पत्रके वाटण्यात आली.

सदर कार्यक्रमासाठी आर.टी.ओ निरिक्षक खटावकर,पो उप-निरीक्षक ड़ोखे,यवत पो स्टे पो उप निरीक्षक घाडगे,पाटस टोल नाका व्यवस्थापक लेखरा आणि स्टाफ व अखील भारतीय ग्राहक मंचाचे दौंड तालुका संघटक विश्वास ताकवणे तसेच  वाहन चालक मोठ्या प्रमाणात उपस्थित  होते.कार्यक्रमाचे आयोजन स.पो.नि नांद्रे म पो केंद्र बारामती फाटा यांनी व त्यांच्या सहकर्यनी केले. 

Friday, January 10, 2020

दापोडी | गायरान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमने [भाग-०२]

 

केडगाव प्रतिनिधी ता.१०जाने २०२०                               दापोडी ता.दौंड येथील गायरान क्षेत्र 345/1 व 345/2 या ठीकाणी गायरान क्षेत्र 7.95  दुर्गादेवी सोसायटी 1.00 क्षेत्र महाराष्ट्र राज्य विद्युत वीतरण कंपनी 2.00 क्षेत्र आहेत.        

परंतु महावीतरण कंपनीच्या पूर्व बाजुला गायरान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.धन दांडग्यानी 5 ते 10 गुंठे जागा बळकवल्या आहे व मोठ मोठी बांधकामे केली आहे.

तर काहीनी जागा धरून तोंडी व्यवहार करुन जागा विकुन पैसे कमवन्याचा धंदा सुरू केला आहे. जागा धरणरे भुमीहीन नाही ना बेघर नाही,ना अल्प भुधारक, अतिक्रमण केलेल्या जागेत सरकारी नोकर व नीमसरकारी नोकर ग्रामपंचायत सदस्य व मोठे शेतकरी व इतर वर्ग राहत आहे. या जागेत कोणाच्या नोंदी नाही. या गायराणात राहन-या लोकांची चौकशी करन्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अनेक लोकाना घरकुल मंजूर झाली परंतु जागा नसल्या कारनाणे त्यात बांधकामे करता आली नाही.परंतु याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही. या गायरानाची मोजणी करुन हद्द दाखवली परंतु हद्द कुठून कुठ पर्यंत आहे.हे अद्याप कुनाला सांगितले जात नाही.
भूमीहीन जागा देण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली.परतु अद्याप कोणताच निर्णय झाला नाही.गावतील भूमीहीन ना खरंच जागेची गरज त्यांना जागा दिली जात नाही.
जागा बळकवन्या-याना पाठीशी घातले जात आहे.भुमीहिनाना जागा देण्याची मागणी देखिल केली जात आहे.आता भुमीहीनाना जागा दिली जाणार का? त्यांच्यावर अन्याय होणार हे पाहने गरजेचे आहे व अतिक्रमण धारक यांच्यावर कारवाई करनार का हे पाहने औचित्यचे ठरनार आहे.

Thursday, January 9, 2020

यवत पोलिसांनी लावला गाडी चोरांचा छडा !

         
            
यवत प्रतिनिधी ता.०९ जाने २०२०

यवत पोलीस स्टेशन हद्दीत गेले काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढलेले असल्याने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी यवत पोलीस स्टेशनच्या स्टाफला मोटर सायकल चोरांचा शोध घेणे बाबत सूचना दिलेल्या होत्या.त्याबाबत पोलीस नाईक बनसोडे व पोलीस कॉन्स्टेबल पंडित हे दिनांक 7/1/2020 रोजी सायंकाळी पुणे सोलापूर हायवे रोडवर पेट्रोलिंग करीत असताना यवत रेल्वे स्टेशन रोडवर दोन मोटार सायकल रेल्वे स्टेशन कडे जाताना दिसले त्यांचे गाडीला मागे नंबर प्लेटवर चिखल लागलेला दिसल्याने पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांना पाहताच मोटारसायकल जोरात पळविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले त्यांना पकडून त्यांना नाव पत्ता तसेच गाडीचे पेपर बाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना यवत पोलीस स्टेशन येथे आणून विचारपूस करता त्यांनी सदरची गाडी ही सहजपूर थोरात वस्ती येथून चोरलेली असल्याचे सांगून आम्ही अजून बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीच्या नऊ मोटारसायकल चोरलेल्या असल्याचे सांगितले त्यांची नावे खालील प्रमाणे 

1)बाळू उत्तम शिंदे वय 32 वर्ष राहणार कोरेगाव भिवर तालुका दौंड जिल्हा पुणे 

2)सोमनाथ आनंद शिंदे वय 34 वर्ष राहणार कोरेगाव भिवर तालुका दौंड जिल्हा पुणे

 यातील आरोपी नंबर 1 व 2 यांना यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 16/ 2020 भादवि कायदा कलम 379 या गुन्ह्यात अटक केली असून दौंड न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी दिलेली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून ही वेगवेगळ्या कंपनीच्या नऊ मोटारसायकल अंदाजे किंमत रुपये दोन लाख चा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे तसेच त्यांनी आणखी बऱ्याच मोटारसायकल चोरल्याचा संशय असल्याने त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे सदरची कामगिरीही ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना,उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा ,पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यवत पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार पोलीस हवालदार महेश बनकर ,पोलीस नाईक दशरथ बनसोडे ,गणेश पोटे पोलीस कॉन्स्टेबल संतोष पंडित, विसहाल गजरे,विनोद रासकर ,नारायण जाधव ,पोलिस होमगार्ड नवनाथ वेताल यांच्या पथकाने केली आहे.

Tuesday, January 7, 2020

दापोडी | गटविकास अधिकारी यांच्या सूचनेकडे केल जातयं दुर्लक्ष (भाग-०१)


  • केडगाव प्रतिनिधी ता.०८ जाने २०२०                                दापोडी ता.दौंड येथे महावितरण कंपनी समोर कच-याचे ढिग सगळीकडे साचवले जात  आहेत.टोलनाका ते दापोडी या रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीसमोर रोज कचरा साठवला जात आहे.व रोज संध्याकाळी हा कचरा पेटवला जात आहे.धुर इतक्या मोठ्या प्रमाणात होत असतो कि रस्त्याने येना-या वाहनाना पुढील रस्त्याचा अंदाज येत नाही.यामूळे किरकोळ आपघात झाले आहे.याबाबाबत ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार केल्या तरी याबाबत ठोस काही कारवाई होत नाही. ग्रामपंचायतीला गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी देखिल याबाबत सुचना केल्या होत्या.मात्र या सूचनेकडे ग्रामपंचायत दुलक्ष का करत आहे हे समजत नाही? 
  • आता ग्रामपंचायत  मोठ्या आपघाताची वाट पाहत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.जर कचरा टाकन-यावर जर कारवाई केली तर हे प्रश्न निर्माण होणार नाही. कचरा टाकना-याला ग्रामपंचायत पाठीशी घालत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामूळे बिनधास्तपणे कचरा टाकुन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
  • सांसद आदर्श गाव दापोडीमध्ये जर रस्त्याने कच-याचे ढिग दिसू लागले तर काय म्हणावे हा कचरा येतो तो गायरान जागेत अतिक्रमण केलेल्या ठिकानाहुन एवढे माहित असताना देखिल कारवाई का होत नाही ?

नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी !


पुणे प्रतिनिधी ता.०७ जाने २०२०
नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे.हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळकेचा 3-2 असा पराभव करुन,महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरने उपविजेता शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन खिलाडूवृत्ती दाखवत मैत्रीचं दर्शन घडवलं.दोस्तीत कुस्ती  नाही,मात्र कुस्तीत दोस्ती नाही असं म्हटलं जातं.त्याची प्रचिती पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने पाहायला मिळालं. दोन्ही मल्ल हे काका पवार यांच्या तालमीतील आहेत.त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. 

विजयी हर्षवर्धन सदगीरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देण्यात आली.हर्षवर्धन सदगीर 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा मानकरी ठरला.

फसव्या कर्जमाफी विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर निषेध !


दौंड प्रतिनिधी : ता.०७ जाने २०२०                                    
 सरसकट कर्ज माफी मिळन्याबाबत फसवी कर्ज माफीचा निषेध करत असल्याबाबत तहसीलदार संजय पटिल यांना राष्ट्रीय समाज पक्ष दौंड यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

दोन लाखापर्यंतची महात्मा फुले कर्जमाफी योजना हि पूर्णपणे फसवी असुन शेतक-यांची दिशाभुल करणारी आहे.
शेतक-याच्या हिताची सरसकट कर्ज माफी करावी जे नियमीत कर्ज भरतात त्यांना देखिल संपुर्णपणे कर्ज माफी करावी.सर्व शेतक-यांना सरसकट कर्ज माफी देऊन न्याय द्यावा.
जर सरकारने कुचराई केली तर राष्ट्रीय समाज पक्ष शेतक-याच्या हितार्थ सरकारच्या विरोधात रस्त्यावर ऊतरुन आंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.

हरिष खोमने जिल्हा अध्यक्ष रा,स,पा, तानाजी केकाण ता.अध्यक्ष,विशाल खताळ,हनुमंत थोरात,विकास खोमने,संजय वेलकर,संतोष रुपंनवर,सचिन भावडे यांनी निवेदन दिले आहे.

कुरकुंभ | दहावीच्या विद्यार्थ्यांची पंधरा वर्षांनी भरली शाळा !



कुरकुंभ प्रतिनिधी : ता.०७ जाने २०२०

कुरकुंभ येथे श्री फिरंगाई माता विद्यालय मध्ये  २००४  सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षांनी एकत्र येत  जुन्या आठवणींना  उजाळा दिला.यावेळी शाळेत माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य नानासो भापकर  होते . 

शाळा कॉलेज संपले की , प्रत्येक जण आपआपल्या  करिअरच्या क्षेत्राकडे धाव घेत असतो. ज्या शाळेमध्ये  आपण शिकलो , लहानाचे मोठे झालो,   येथील जुन्या मित्रांना मैत्रिणींना  भेटावे. असे विचार सर्वाना येत असत परंतु कामांच्या व्यापात शक्य होत नव्हते. परंतु या विद्यालयात २००४  सालच्या  दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम  घेऊन या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या निमित्त ३५ ते  ४० मुले व मुली एकत्र आल्या. यावेळी या विद्यार्थांमधून कोण इंजिनिअर, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, तर कोण उद्योजक झाले आहेत . हे पाहून शाळेचे प्राचार्य नानासो भापकर यांचे मन खूप भरावून गेले . यावेळी या विद्यार्थ्यांनी  आपल्या करिअरमध्ये  नाव कमावल्याने भापकर यांनी शाबासकी दिली. 

 शाळा सोडल्यानंतर पुन्हा  संमेलनाच्या निमित्ताने भेटल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. सर्व एकमेकांची कुटूंबाची आपुलकीने विचारपूस करू लागले . यावेळी माजी शिक्षक देखील उपस्तिथ होते. या शिक्षकांनी आपआपले मनोगत व्यक्त करत असताना या मुलांना असे वाटले की आपण पुन्हा या शाळेत शिकत आहोत की काय या शिक्षकांचे मनोगत  ऐकण्याची संधी या विद्यार्थ्यांना पुन्हा मिळाली. या वेळी शिक्षकांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी या विध्यार्थ्यांनी  आदरभावाने शिक्षकांचे  चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले.  या स्नेह संमेलना वेळी माजी विद्यार्थ्यांनी या शाळेत वीस वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले.  तसेच माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला एक लोखंडी कपाट भेट देण्यात आले या वेळी धनंजय गाढवे, अजिनाथ भुजबळ , विकास पवार, अमृता लोणकर,  या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी झगडे व रुपाली देशमुख यांनी केले तर आभार संदीप जगताप यांनी केले.

Monday, January 6, 2020

गुटखा विक्री करण-यावर लवकरच कारवाई - भुजबळ (भाग-०३)

                                             
केडगाव प्रतिनिधी : ता.०६ जाने २०२०
केडगाव-चौफुला रस्त्याच्या कडेला व केडगाव बाजार पेठेतील किरणा दुकानात असलेल्या डब्यात इतर मालाच्या वस्तू कमी मात्र गुटख्याचे पुडे जास्त पहावयास मिळत आहे.व स्टॉक मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती नावे न सांगण्याच्या अटीवर देण्यात  आली आहे.
गुटख्याचे स्टॉक करून हे गुटखा किंग मोठ्या प्रमाणात विकत असतात.मग हे कुण्याच्या आशिवार्दाने चालू आहे.तेही भरपेठेत व केडगाव चौफुला रस्त्याला लगत जर न्यायालयाचे नियम झूगारुन चालत असेल तर याला काय म्हनावे ?  
जर न्यायालयने गुटखा बंदीचा निर्णय घेतला असला तरी तालुक्यात गुट्खा येतो कुठून असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे.                                      
 प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी केडगाव एस.जी.होलमाने यांनी सांगितले कि,गुटखा खान्यात आल्यावर तोंडाचा कॅन्सर,गळ्याचा कॅन्सर होऊ शकतो तसेच गुटख्यात निकोटींनचे प्रमाण जास्त असल्याने रक्त वाहिन्यावर त्याचा परिणाम हाऊ शकतो.हार्ट अॅटॅक देखिल होऊ शकतो.त्यामूळे असा शरीरावर परीणाम होत असेल तर या विक्रीवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मत जूने जानकार व्यक्ती करु लागले आहे.         
अन्न प्रशासन अधिकारी भुजबळ यानी सांगितले कि यापुर्वी आम्ही तालुक्यात गुटखा विक्री करण-यावर कारवाया केल्या आहेत.गुट्खा विक्री करण-यावर  मोठ्या प्रमाणावर कारवाई करणार असल्याचे डी न्यजू लाइव्ह या वृत्तवाहिनीशी फोन द्वारे बोलताना सांगितले.

Sunday, January 5, 2020

दौंड येथे महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन साजरा !


दौंड प्रतिनिधी ता.०६ जाने २०२०
०१  जानेवारी २०२०  ते  ०५ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन राज्य राखीव पोलीस गट क्र ०७ दौंड पोलिस दल या ठिकाणी साजरा करण्यात आला.
गट मुख्यालयात विविध कार्यकमाचे आयोजन करुन शाळेतील मुलांना शस्त्र प्रदर्शन दाखवून त्याना शस्त्र बाबत माहिती देण्यात आली. 
निबंध स्पर्धा,वाद विवाद स्पर्धा,चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

०४ जानेवारी २०२० रोजी पोलिस महासंचालक अर्चना त्यागी तसेच राज्य राखीव पोलिस गट क्र १६ भारत राखीव बटालियन ०३ कोल्हापुरचे समादशक जयंत मिना,सहायक समादेशक जमदाडे यांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षण प्रमूख पोलिस उपनिरीक्षक पी.एल.गाडे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने क्र ०७ दौंड येथे पोलिस दला विषयी माहिती तसेच विविध कार्यक्रम कब्बडी,खो-खो, स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
आनाथ आश्रम दौंड येथे विद्यार्थ्यांना पोलिस दलाविषयी जनजागृती करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना आल्पोहर देण्यात आला होता. 

Saturday, January 4, 2020

सुतार दांपत्याला पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ तपस्येनंतर अपत्यप्राप्ती !

मांडवगण फराटा प्रतिनिधी : ता.०५ जाने २०२०

मांडवगण फराटा येथील दांपत्याला सुमारे २५ वर्षांनंतर डॉ.अतुल सुराणा व डॉ.सारिका सुराणा यांच्या प्रयत्नांमुळे अपत्यप्राप्तीचे सुख अनुभवायला मिळाले.

याबाबत सविस्तर असे की, नैना चंद्रकांत सुतार यांच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण होऊन देखील सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असताना हे दाम्पत्य संतती प्राप्तीपासून वंचित होते त्यासाठी त्यांनी सर्व शर्थीचे प्रयत्न करून देखील त्यास म्हणावे असे यश येत नव्हते त्यामुळे त्यांनी अपत्य प्राप्तीचा विचार जवळपास सोडलाच होता. हि व्यथा मांडवगण फराटा येथील डॉ.अतुल सुराणा व डॉ.सारिका सुराणा यांना सांगितली. त्यानुसार त्यांनी सर्व रिपोर्ट्स पाहून आपण एक शेवटचा प्रयत्न करून पाहू असे म्हणून आधार दिला व ते सर्व रिपोर्ट्स  पाटस येथील डॉ धवल वैद्य यांना दाखवून त्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी करण्याचा निर्णय घेतला .पण त्यापूर्वी गर्भाशयात असलेल्या गाठी काढणे गरजेचे होते.त्यानुसार त्या गाठी काढण्यात आल्या.नियतीच्या मनातही चांगले असल्याने पहिल्याच प्रयत्नात सुतार दाम्पत्यांना गर्भधारणा झाली पण खरी कसोटी इथून पुढे होती,  कारण नैना सुतार यांना मधुमेहाचा आजार जडला होता. त्यामुळे डॉ.वैद्य व डॉ.सुराणा यांनी मधुमेहावर यशस्वीरीत्या नियंत्रण ठेवून गर्भधारणेचे नऊ महिन्यांचे टप्पे पार पडले.अखेर तब्बल पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ तपस्येनंतर सुतार दाम्पत्याने एका गोंडस बाळाला जन्म दिला .विहान आय व्ही एफ सेंटर च्या माध्यमातून गरजू रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याचा मानस डॉ.धवल वैद्य  यांनी व्यक्त केला .तसेच आतापर्यंत ३४ आय व्ही एफ पैकी २८ जणांना यशस्वीरीत्या गर्भधारणा करून देण्याचा मोलाचा वाटा डॉ धवल वैद्य यांनी व्यक्त केला. तसेच सुतार दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आमची कामाची पावती असल्याचा आनंद   डॉ.वैद्य व डॉ.सुराणा यांनी व्यक्त केला व यापुढील  काळातही गरजू रुग्णांसाठी व त्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाईची मागणी - मंगेश फडके


केडगावमध्ये गुटखा विक्री जोमात - भाग (०२)

केडगाव प्रतिनिधी : ता.०४ जाने                                             केडगाव ता.दौंड येथील बाजारपेठेत व केडगाव-चौफुला रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात गुटखा विक्री जोमात सर्यास होत आहे.मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री,बेंगलोर गुटखा हा जास्त प्रमाणात युवकांच्या खान्यात येत असतो.
तो इतर कोणत्या ही दुकानात न मिळता तो मोजक्या दुकानात मिळत असल्याने या बेंगलोर गुटख्याला जास्त मागणी आहे. तो इतर ठिकाणी मिळत नसल्याने चढ्या बाजाराने त्याची विक्री केली जात आहे.गुटख्यामुळे आपण आजाराना निमंत्रण देत आहोत हे देखिल तरूण पिढीला माहित असताना देखिल गुट्खा खाणे एक प्रकारे शान असल्याचे दाखवत आहे.
जर विक्रीच केली नाही तर गुटखा खान्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.जर हि विक्री खुले आम होत असेल तर कोनाच्या आशिवार्दाने होत आहे अशी चर्चा सध्या केडगाव या ठिकाणी रंगू लागली आहे.                                      
न्यायालयाने गुटखा विक्री वर बंदी घातली आहे. तरी देखिल खुलेआम हि विक्री होत असते. न्यायालयाच्या निर्णयाला न जूमानता हि विक्री होत असते.या गुटख्याचे व्यसन तरून पिढीला लागले आहे व तरून पिढी बरबाद होत आहे.जर अशा  अवैध विक्री करण-यावर कारवाईची मागणी मंगेश फडके प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दारू बंदी समिती यांनी केली आहे.याबाबत संबंधित खात्याशी पत्र व्यवहार करनार असल्याचे त्यांनी सांगितले.

Friday, January 3, 2020

दुकानावर किराणा मालाची पाटी आत मात्र गुटख्याची विक्री !



 केडगाव मध्ये गुटखाविक्री व्यवसाय फोफावतोय ?
केडगाव प्रतिनिधी ता.०३ जाने २०२० [ भाग - ०१ ]
केडगाव ता.दौंड येथे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे.न्यायालयाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे.तरी देखील खुलेआम ही विक्री होत असते.
न्यायालयाच्या निर्णयाला न जूमानता ही विक्री होत असते.केडगाव येथे गुटखा खरेदी करण्यासाठी आसपासच्या गावातील दुकानदार येत असतात, त्यामध्ये बोरीपारधी,दापोडी,पारगाव,नानगाव,चौफुला,वरवंड,कडेठाण,हातवळण या गावतील दुकानदार येऊन गुटखा खरेदी मोठ्या प्रमाणात करत असतात.
रोज सकाळी  सहा ते सात वाजण्याच्या  सुमारास केडगावमध्ये गुटखा घेऊन येणारी गाडी येत असते.रोज सकाळी हा गुटखा दोन तीन दुकानात खाली केला जातो.ही नित्याची बाब झाली आहे.हे सर्व होत असताना पोलिस प्रशासनाला चाहुल कशी लागत नाही.हे नवलच म्हणावे लागेल.
पोलिस प्रशासन नजरेतून कोणतीच गोष्ट चुकत नाही.मग गुटखा विक्री करणारे कसे चुकले हा चर्चेचा विषय झाला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात  गुटखा केडगावमध्ये येऊन त्याची विक्री होते व गुटख्याची साठवनूक मोठ्या प्रमाणात होत असून देखील कारवाई होत नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
केडगाव बाजार पेठेतील एका दुकानात इतर वस्तु खरेदी करण्यापेक्षा गुटखा खरेदी करणा-याची गर्दी जास्त असते. ते देखिल भरबाजार पेठेत व केडगाव-चौफुला रस्त्याच्या कडेला किराणा मालाच्या दुकानात होत असते.


नानगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालोउद्यानाचे उद्घाटन !


दौंड प्रतिनिधी : ता.०३ जाने २०२० (दिपक पवार)
मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती (ता.०३) रोजी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेने तसेच शासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
 सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नानगाव ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य व नागरिकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत महिलांचे हिमोग्लोबिन रक्त चाचणी यावेळी घेण्यात आली होती.

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाळेतील मुलांना खेळण्यासाठी क्रांतीज्योती बालोद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.त्याचबरोबर हॅड वॉश स्टेशन व शाळेत सी सी टीव्ही कॅमेरेही लोकवर्गणी सहभाग व जिल्हा परिषद यांच्यामार्फत बसवण्यात आले आहे.
तनिष्का गुंड या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित वेशभूषा घालून एक नाटिका सादर केली.तसेच विष्णू खराडे यांनी विद्यार्थी वर्गाला आपल्या वकृत्व शैलीतून सखोल असे मार्गदर्शन केले.

यावेळी या कार्यक्रमासाठी नानगाव ग्रामपंचायत सरपंच पुष्पा गुंड,माजी सरपंच सी बी खळदकर,उपसरपंच सुनिता रासकर,विशाल शेलार,विष्णू खराडे,राजेंद्र खोमणे,पोपट शेलार,कुलदीप गुंड,संजय रासकर,पोपट खळदकर,दिपक खळदकर,संतोष खळदकर,संदीप आहेरकर,व्ही.आर.पाटोळे,ए.आर.खळदकर,एस.बी.वेताळ,एस.टी.भोसले,आर.एस.सातकर व पालकवर्ग आणि शाळा व्यवस्थापन समीती आदि मान्यवर उपस्थित होते.

Thursday, January 2, 2020

पुणे-सोलापूर महामार्गावरील वाखारी येथे ट्रक व बोलेरोची धडक !


केडगाव प्रतिनिधी ता.०२ डिसें   

 वाखारी ता.दौंड येथे पुणे-सोलापुर हायवेवर ट्रकला बोलेरोने (ता.०१) रोजी रात्रीच्या १.०० वाजण्याच्या सुमारास धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.                                   सविस्तर माहिती आशी की, ट्रक नं MH.12 AR 2586 ता 1/1/2020 रोजी रात्री 1च्या सुमारास पुणे सोलापुर हायवेवरुन वळण घेत असताना एक बोलेरो जीप वेगाने येऊन ड्रायव्हर साईडला असलेल्या डिझेल टाकी जवळ धडक बसून अपघात झालाआहे.
बोलेरो जीपमधील ड्रायव्हर व त्यामधील असलेल्या 7 ते 8 महिला यांना अपघातात  होऊन गंभीर व किरकोळ दुखापत झाली आहे.बोलेरो मधील जखमींना जीप मधून बाहेर काढून बोरीपारधी येथील खाजगी दवाखाण्यात अॅङमीट करण्यात आले आहे. जीप नं mh 42 K 0819 आसा आहे. सदर अपघात हा बोलोरो मधील चालक संदीप पाराजी वाघमोडे रा.बोरिपारधि यांच्या चुकीमुळे झाला असल्याची फिर्याद शिवाजी तुळशीराम बंगर रा.भायाळा यांनी दिली आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धनंजय कापरे, पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे हे करत आहे.
पोलिस काॅनस्टेबल बाळासाहेब चोरमले व पोलीस शिपाई दिपक यादव यांनी अपघात ठीकाणी मदत केली.

Wednesday, January 1, 2020

संगणक परीचालकांवर आली उपासमारीची वेळ !


दौंड प्रतिनिधी : ता.०१ जाने        
दौंड तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत संगणक परीचालक जवळपास 50 च्या आसपास आहे.हे ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत आहे.चार महीन्यापासून संगणक परीचालकांना मानधन अद्याप मिळाले नाही.आता या कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.
  मानधन वाढीसाठी अनेक अंदोलने करण्यात आली आहे. महिन्याला सहा हजार मानधन दिले जाते.ते देखिल वेळेवर मिळत नसल्याने कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण वेळ काम असल्याने दूसरे देखिल काम करता येत नाही.त्यामूळे कूटुंब चालवायच कसा असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामपंचायत मधून आपले सरकार सेवाकेंद्र अंतर्गत एक लाख 20 हजार रुपयाचा चेक दिला जातो.तो जि.प.परीषदेकडे जमा केला जातो.नंतर तो csc कडे वर्ग केला जातो.
 परंतु  यामधून सहा हजार रुपये मानधन दिले जाते.व 6 हजार     स्टेशनरी,देखभाल खर्च असतो. परंतु आता स्टेशनरी देखिल दिली जात नाही.
आता मायबाप सरकार याकडे लक्ष देणार का? आसा प्रश्न उपस्थित होत आहे.