ClBIL SCORE काय असतंय ???
हे सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?
हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून
या कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये .
Credit Information Bureau Ltd . या कंपनीची स्थापना झाली .
आज या कंपनीचे नाव TransUnion CIBIL Ltd असे आहे .
ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे .
आणि यावर RBI ची मॉनीटरींग आहे .
समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला .
तर बँक म्हणते दोन . तीन दिवसांनी या !
आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ?
तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा CIBIL रिपोर्ट मागावते .
आणि त्याची पेमेंट हिस्टरी , तसेच त्याचा CIBIL स्कोर चेक करते ?
जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर , नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़.
CIBIL स्कोर हा
300- - - - - - - ते -- -- -- -- 900
मध्ये मोजला जातो .
जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल .
पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा !
कर्ज मिळतच नाही .
म्हणजे समजलं !
कि बँका कर्ज देणे का नाकारतात ?
तर CIBIL Score नीट नसतो .
* CIBIL Score कमी का होतो ? *
1) कर्जाचा EMl वेळेवर न भरणे .
2) कर्जाची परतफेडच न करणे .
3) चेक बाऊन्स होणे
4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे
5) स्वतःवर असणारे कर्ज NPA मध्ये जाऊ देणे
6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे .
यामुळे CIBIL score वर वाईट परिणाम होतात .
बघा , मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी , शेवटी आतून त्या एकच असतात , त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते .
याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण बँकांना आणि फायनान्स कंपनी ला मूर्ख बनवू शकत नाही .
बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे , पण लोन अमाऊंट योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते .
तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL score सुधारेल ?
1) EMI वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका .
2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट )
3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan Digital loan कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत , ही शिस्त सांभाळा
4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या .
5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही .
6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा .
CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते .
या मध्ये
-1
NA - No Activity
NH - No History
असे पर्याय दिसू शकतात .
तर काय करा कि , एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा , अशा प्रकारे CIBIL मध्ये आपली History तयार होईल .
म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज ,
बुडवू तर नकाच , परंतु वेळेत फेडा !
नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही .