डी न्यूज लाइव प्रतिनिधि : ता.०७ सप्टेंबर
दापोडी ग्रामपंचायतीचे सदस्य व वि.का.सोसायटीचे चेअरमन बबन खोडवे यांचा रासप मधुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समर्थकांसह जाहीर प्रवेश करण्यात आला आहे.
दापोडी तालुका दौंड येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. गायकवाड वस्ती, इगंले वस्ती येथे रस्ताचे खडीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.
तर शिदगुर वस्ती येथे खडीकरण,नानगाव ते रुपनवर वस्ती रस्त्याचे भूमिपूजन केले.
समाज मंदिर सभा मंडपचे भूमिपूजन,वडवली येथे सिंमिटी रस्त्याचे उदघाटन करण्यात आले.तर नामदेव ताकवणे जिल्हा नियोजन समिती सदस्य यांनी पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी 10 लाख निधी दिला होता.
ते काम पूर्ण झाले याचे उदघाटन माजी आमदार,जिल्हा बैंकचे चेअरमन रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आप्पसाहेब पवार, रामभाऊ टुले, नामदेव ताकवने, दिलीप हंडाळ, सयाजी ताकवने, राणी ताई शेळके, नंदा ताई भांडवलकर, शिवाजी रुपनवर, सुहास रुपनवर, सुनिल मोहिते, सुनिल रुपनवर, हितेज रुपनवर, अजीज शेख, अशोक नरुटे, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी दापोडी ग्रामपंचायतीचे मा.सदस्य व वि.का.सोसायटीचे मा.चेअरमन बबन खोडवे यांनी रासप मधुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समर्थकांसह जाहीर प्रवेश केला आहे.