Monday, September 9, 2019

झगमगाट सोडून साध्या पद्धतीने श्रीची स्थापना !


लोणी काळभोर - प्रतिनिधी - येथील शिवतेज मित्र मंडळाने साध्या पद्धतीने श्रीची स्थापना केली. या मंडळाने लहान बालगोपाळासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मंडळाचे अध्यक्ष दिपक भुजबळ व उपाध्यक्ष तुषार कोलते.

          मूनलाईट मित्र मंडळ याने गणेशाची स्थापना केली आहे. या मंडळाचे अध्यक्ष विक्रम संजय ठोंबरे व उपाध्यक्ष जितेश प्रकाश बागुल हे आहे.

        श्रीकृष्ण मित्र मंडळ याने बागेच्या राजाची कायमस्वरूपी गणेशाची साधेपणाने स्थापना करण्यात आली आहे. या वेळी मंडळाने मांडवाचा खर्च हा कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.

          शितळादेवी मित्र मंडळाने डोगरचे देखावे करून त्यामध्ये श्रीची स्थापना केली आहे. मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य उपाध्ये व उपाध्यक्ष तुषार भाले या मंडळाचे मार्गदर्शक आभिमन्यू उपाध्ये हवेली तालुका  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस हे होय.