डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधि : ता.०९ सप्टेंबर २०१९
खोपोडी ता.दौंड येथे टेम्पोची मोटरसायकलला धडक बसल्याने एक ठार तर एक जखमी झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दीपक बबन ताकवने व त्यांचा मूलगा मयुर ताकवने मोटरसायकल नंबर एम.एच.42 ए.बी.1924 वरुन केडगावकडे चालले होते.
समोरुन एक टेम्पो नंबर एम.एच.14 सी.पी 4823 विरुद्ध दिशेने येऊन त्याची ठोस मोटरसायकलला बसल्याने दोघे मोटरसायकल वरुन खाली पडले. त्यांच्या डोक्यास,बरगडीस, पायास इतर ठिकाणी मार लागला होता.
दोघानाही दवाखान्यत नेण्यात आले होते.
दीपक ताकवनेयाना मृत घोषित केले.तर मयुर याला उपचारासाठी लोणी काळभोर येथे खाजगी दवाखाण्यात दाखल केले आहे. ही घटना 9/9/2019 रोजी घडली. पूढिल तपास पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे हे करत आहे.