डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधि:ता.२४ सप्टेंबर २०१९
राष्ट्र्वादी डॉक्टर सेलच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी डॉ.वंदना मोहिते यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
सदर नियुक्ति पत्र बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सूळे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ.शिवदिप उंद्रे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्र्वादीचे अध्यक्ष रविंद्र कंधारे उपस्थित होते.याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सदस्य अशोक खळदकर,जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे,युवक अध्यक्ष विकास खळदकर,अजित शितोळे, वसंतराव वाघोले ,अर्जुन वाघोले, दिपाली पवार व आदि मान्यवर उपस्थित होते.