डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.१३ सप्टेंबर २०१९
निनाद फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने अंकलखोप येथील अंगणवाडी(माळीभाग) येथे विदयार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
समाजसेवेची आस असणाऱ्या काही तरुणांनी मिळून “निनाद फाऊंडेशन” ची स्थापना केली आहे. हे फाऊंडेशन पर्यावरण क्षेत्रात सतत कार्यरत असून पर्यावरणातील विविध समस्या सोडवण्यासाठी नवनवीन कल्पनांचा वापर करण्यात सतत अग्रभागी असते.नुकत्याच येवून गेलेल्या महापूरामुळे शालेय विदयार्थ्यांचेही मोठे हाल झाले. त्यांच्या शैक्षणिक साहित्याचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले. म्हणूनच शालेय विद्यार्थ्याना शालेय उपयोगी साहित्याची मदत करण्यासाठी निनाद फाऊंडेशनने अंकलखोप ता. पलूस जि. सांगली येथील मळी भागातील अंगणवाडी क्र. 156 मध्ये शालेय विद्यार्थ्यांना ब्लॅक बोर्ड,टेबल,नेत्यांचे फोटो,कचरा पेटी,घड्याळ,चटई, पटाके,अंकलीपी,वह्या,पाणी बॉटल,जेवणाचे डब्बे,कंपास बॉक्स, खेळणी,रंग पेन ,मुलांना खाऊ अशाप्रकारचे शालेय साहित्याचे वाटप केले.