डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी- ता.०४ सप्टेंबर २०१९
वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळुन पिंपळगाव(ता.दौंड)येथील अशोक तुकाराम खोरकर यांनी आपल्या नातवाचा मयुरेश रवींद्र खोरकर याचा वाढदिवस गलांडवाडी(ता.दौंड) येथील अनाजी खाडे बालकश्रमातील मुलांसमवेत साजरा केला.
वाढदिवसानिमित्त येथील मुलांना जेवन व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच आर्थिक मदत देखिल करण्यात आली. या बालकश्रमात सुमारे तिस विद्यार्थी असून शासनाचे एक ही रूपयाचे अनुदान मिळत नसताना या मुलांचे संगोपन येथे केले जाते.
मयुरेश सह श्रावणी चोरमले,तृप्ती खोरकर-मदने, व बालकाश्रमातील विद्यार्थी गणेश धायगुडे याचाही 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने साजरा करण्यात आला.यावेळी मुलांनी आपल्या अप्रतिम आवाजात हरिपाठाचे सादरीकरण केले.
हाँटेलमध्ये मध्ये केलेल्या पार्टी पेक्षा अनाथ आश्रमात केलेल्या कार्यक्रमाचा आनंद कित्येक पटीने जास्त आहे व प्रत्येकाने याच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे अवाहन यावेळी खोरकर कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी अशोक खोरकर,नाना चोरमले,गजानन मदने,दिपक शिंदे,पप्पु चोरमले,विकास गडधे,सुजाता गडधे,पुजा गडधे,सतिश नातु,शरद धुमाळ, सौरभ बंड,बनकर,लता खोरकर,संगिता तिखोळे, संस्थेचे व्यवस्थापक बापु गोफणे आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.