Monday, September 23, 2019

खोपोड़ी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध प्रफुल शितोळे यांची निवड



डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधि : ता.२३ सप्टेंबर २०१९

खोपोडी ता.दौड गावची उपसरपंच पदाची निवडणूक आज ता.२३ रोजी ग्रामविकास अधिकारी जाधव यांच्या अधिपत्याखाली पार पडली.
पूर्वी उपसरपंच पदावर असलेल्या रोहिणी शितोळे यांनी राजीनामा दिला.
रिक्त झालेल्या उपसरपंच पदी अपक्ष निवडून आलेले प्रफुल्ल शितोळे यांनी फॉर्म भरल्यानंतर कोणाचाही फॉर्म न आल्याने निवडणूक अधिकारी जाधव यांनी बिनविरोध उपसरंपच म्हणून प्रफुल्ल शितोळे यांची निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी सरपंच सुवर्णा साळवे,सदस्या रोहिणी शितोळे,सदस्य भाऊसाहेब मेमाणे,खोपोडी विकास सोसाइटीचे चेअरमन भाऊसाहेब हंडाळ,संचालक दत्तात्रय शितोळे, राजाराम कदम,अंबादास शितोळे, रामचंद्र निकम,भाऊसाहेब शितोळे, किसनराव पवार, बाळासो निकम,पोपट जाधव, भगवान साळवे,योगेश शितोळे, रवींद्र शितोळे व आदि मान्यवर उपस्थित होते.