Tuesday, September 10, 2019

प्रशासनाला जागं करण्यासाठी कचेरी समोर गाढवाच लग्न !



दौंड प्रतिनिधि : ता.१० सप्टेंबर २०१९ 

विविध मागण्यांसाठी माहिती सेवाभावी संस्था व किसान जनक्रांती तर्फे तहसीलदार कचेरी दौंड समोर प्रशासनाला जाग यावी म्हणून गाढवाचं लग्न  करत आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले.

दौंड तालुक्यातील कुरकुंभ,पांढरेवाडी MIDC मधील धोकादायक कंपन्यांची चौकशी करून त्या बंद  करण्यात याव्या त्यासाठी माहितीसेवा भावी समिती व किसान जनक्रांती सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे.यामध्ये कुरकुंभ पांढरेवाडी MIDC मधील अल्कली अलाईन्स सारख्या धोकादायक कंपन्या बंद  करण्यात याव्या तसेच MIDC परिसरातील नापीक झालेल्या जमिनीतील मातीची चाचणी करून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी तसेच कुरकुंभ येथील स्थानिक तरुणांना 80% नोकऱ्या मिळाव्यात.
दौंड शहरातील पूरग्रस्तांना व शेतकऱ्यांच्या जमिनीचा पंचनामा करून त्वरित मदत मिळावी तसेच भामाआसखेड च्या पुनर्वसनचा शेरा कमी करून मिळणे व इत्यादी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
 यामध्ये गाढवाचं लग्न  लावत  प्रशासनाचा निषेध करण्यात आला.