डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधि : ता.११ सप्टेंबर २०१९
पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभेसाठी शिवसेना पक्षाचे इच्छुकांनी शिवसेना भवन दादर येथे मुलाखती दिनांक 10 सप्टेंबर 2019 रोजी दिल्या आहेत.
त्यामध्ये शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक शरदचंद्र सूर्यवंशी यांनी दौंडमधून तसेच उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनीही उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून अर्जासोबत मुलाखती दिली आहे.
शिवसेना पक्षाच्या आदेशानुसार स्वबळावर निवडणूक झाली तरी शिवसेनेकडे जोरदार तयारी व सक्षम उमेदवार असल्याचे याठिकाणी सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न तसेच रस्त्यांचा प्रश्न कायम भेडसावत आहे. मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे त्यामुळे लोकांचा असंतोष आहे.
त्याचप्रमाणे बेरोजगारी,महागाई, दूध व शेतीमालास कमी बाजारभाव,या बाबतींमध्ये दौंड तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी कुठल्याही प्रकारची उपाययोजना केल्याचे दिसून येत नसल्याने प्रस्थापितांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.