बारामती प्रतिनिधी : (विकास कोकरे) महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालन याकडून राज्य बँक घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या निषेधार्थ (ता.२५) बारामती येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
बारामती तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की,राजकारणामध्ये ईडीचा सहभाग वाढत चालला आहे व यामुळे सरकार विरोधकांना दडपण्यासाठी कुटील राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बोलला जात आहे.
जर असेच खोटे गुन्हे दाखल होत राहिले तर बाळासाहेब ठाकरेंनी व जॉर्ज फर्नांडिस यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र पेटवला होता त्यापेक्षाही जास्त प्रमाणावर महाराष्ट्र पेटविण्याचे काम युवक करतील असे बारामतीतील युवकांकडून बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती दाखल झालेल्या खोट्या गुह्याच्या निषेधार्थ चौफुला ता दौंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी आप्पासाहेब पवार,वैशाली नागवडे,रामभाऊ टूले,विकास खळदकर,नितीन दोरगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे आदी मान्यवर उपस्थित होते.