डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.१० सप्टेंबर २०१९ (खडकी)
खडकी ता.दौंड येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण समारंभ सोहळा पार पडला.
माजी आमदार रमेश थोरात व जि.प.सदस्य वीरधवल जगदाळे यांची वाजत गाजत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली होती.विकासनिधी हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच वापरला पाहिजे.व त्याचा विनियोग हा चांगल्या कार्यासाठी केला पाहिजे असे यावेळी रमेश थोरात यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात,तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे व आदि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.
त्याच बरोबर यावेळी पांडुरंग मेरगळ,उत्तम आटोळे,सारिका पानसरे,दिलीप हंडाळ,नितीन दोरगे,विकास खळदकर,अजित शितोळे तसेच खडकी पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन,संचालक आणि आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.