डी न्यूज लाइव्ह केडगांव प्रतिनिधि : ता.२४ सप्टेंबर २०१९
दापोडी तालुका दौंड़ येथे बिबट्यांची ठसे दिसल्याने नागरिकांमध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी दापोडी येथे ९ लोकांवर बिबट्या सदृश प्रान्याने लोकांवर हल्ला केला होता.
त्यानंतर पिंजरा लावण्यात आला होता परंतु बिबट्या पिंज-यात काही अडकला नाही.
दापोडी-कडेठाण ओढ-यालगत असणा-या शेतात बिबट्याचे ठसे दिसुन आले आहेत.
या भागात उसाचे शेत मोठ्या प्रमानात असुन पानी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
त्यामूळे बिबट्याचा वावर या भागात ब-याच दिवसा पासून असू शकतो.
सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे ठसे स्पष्ट दिसले आहेत. या भागात पिजंरा लावला जाणार असुन लोकांनी सावध राहण्याचे आवहन वनविभागा कडुन देण्यात आले आहे.