Thursday, September 26, 2019

दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या ज्येष्ठ बंधूचे दुखद निधन !


दौंड प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील खुटबाव येथील प्रगतशील शेतकरी व भैरवनाथ शिक्षण संस्थेचे चेअरमन पोपटराव किसनराव थोरात (वय ७१) यांचे मंगळवार (दि.२४) रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.ते दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन रमेश थोरात यांचे जेष्ठ बंधू होत.
त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांची खुटबाव परिसरातील प्रगतशील बागायतदार म्हणून ओळख होती. त्यांचा नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात सहभाग असायचा.अंत्यविधी वेळी दौंडचे आमदार राहुल कुल, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे,माजी आमदार अशोक पवार,माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.