Thursday, September 26, 2019

प्रथमच नानगांव ग्रामपंचायतीमध्ये 'गुंड' यांना सरपंच पद !


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.२७ सप्टेंबर २०१९

१५ ऑगस्ट रोजी माजी सरपंच सी बी खळदकर यांनी यापूर्वी राजीनामा दिला आहे.त्यामुळे सरपंच पद हे रिक्त झाले होते.त्यासाठी सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.सकाळी ११.०० ते १२.०० वाजन्याच्या सुमारास अर्ज भरण्यात आला होता.दरम्यान एकच अर्ज आल्याने पुष्पा वासुदेव गुंड यांची सर्वानुमते नानगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड आज(ता.२५) रोजी करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून वरवंड मंडल अधिकारी महेश गायकवाड यांनी काम पाहिले होते.
गेले पाच वर्षांपूर्वी सी बी खळदकर व विश्वास भोसले यांच्या पॅनेल मधून नऊ उमेदवार निवडून आले होते.त्यातील सर्व उमेदवाराला ग्रामपंचायत चे पदाधिकारी बनवले जाईल असा शब्द दिला होता तो आज त्यांनी विश्वासाने पाळला आहे.त्यामुळे नागरिकांना मधून त्यांचे सर्वांचे स्वागत करण्यात आले.
१९५४ साली स्थापना झालेली नानगांव ग्रामपंचायत आजतागायत सरपंच पदी गुंड घराण्यातील उमेदवाराला संधी मिळाली नव्हती.
पंचवार्षिक निवडणूकित शब्द दिला होता तो आज पाळण्यात आला व इतिहासात प्रथमच गुंड यांना सरपंच पद मिळाले म्हणून सर्वत्र गावात उत्साहाचे वातावरण झाले होते.रासाई देवी मंदिरात अभिनंदन सभा घेण्यात आली व सर्वांचे यावेळी आभार मानन्यात आले.

बारामती बंद ला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : चौफुला ता दौंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन !


बारामती प्रतिनिधी : (विकास कोकरे)  महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालन याकडून राज्य बँक घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या निषेधार्थ (ता.२५) बारामती येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
बारामती तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की,राजकारणामध्ये ईडीचा सहभाग वाढत चालला आहे व यामुळे सरकार विरोधकांना दडपण्यासाठी कुटील राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बोलला जात आहे.

जर असेच खोटे गुन्हे दाखल होत राहिले तर बाळासाहेब ठाकरेंनी व जॉर्ज फर्नांडिस यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र पेटवला होता त्यापेक्षाही जास्त प्रमाणावर महाराष्ट्र पेटविण्याचे काम युवक करतील असे बारामतीतील युवकांकडून बोलले जात आहे.

राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष  शरद  पवार  व माजी उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्यावरती  दाखल झालेल्या खोट्या गुह्याच्या निषेधार्थ चौफुला ता दौंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी आप्पासाहेब पवार,वैशाली नागवडे,रामभाऊ  टूले,विकास खळदकर,नितीन दोरगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे आदी मान्यवर उपस्थित होते.

दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या ज्येष्ठ बंधूचे दुखद निधन !


दौंड प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील खुटबाव येथील प्रगतशील शेतकरी व भैरवनाथ शिक्षण संस्थेचे चेअरमन पोपटराव किसनराव थोरात (वय ७१) यांचे मंगळवार (दि.२४) रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.ते दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन रमेश थोरात यांचे जेष्ठ बंधू होत.
त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांची खुटबाव परिसरातील प्रगतशील बागायतदार म्हणून ओळख होती. त्यांचा नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात सहभाग असायचा.अंत्यविधी वेळी दौंडचे आमदार राहुल कुल, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे,माजी आमदार अशोक पवार,माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.



दौंड | खडकी | रासपा कार्यकर्त्यांची राष्टवादी कॉंग्रेस मध्ये घरवापसी !




दौंड प्रतिनिधी :   दौंड तालुक्यातील खडकी येथील रासप कार्यकर्ते  यांनी  पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.तो ही काही तासात त्यामुळे रासपमध्ये अस्वस्थ निर्माण झाली आहे.पहिल्या पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त असलेले दीपक काळे सामजिक कार्यकर्ते  व पन्नास ते साठ स्थानिक नागरिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये माजी आमदार रमेश थोरात,जिल्हा परिषदचे अध्यक्ष विश्वास देवकाते व आप्पासाहेब पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश  केला.


दिपक काळे हे गावच्या  कामानिमित्ताने आमदार राहूल कुल यांच्याकडे गेले असता त्यांच्या हातात पुष्पगुच्छ देऊन फोटो सोशल मिडियावर व्हायरल केला. दीपक काळे यांनी रासप मध्ये प्रवेश केला.परन्तू काही तासात चिंचोली येथे माजी आमदार रमेश थोरात आले असता घडलेली घटना सांगितली.मी तुमचा आहे असे म्हणत पुन्हा माजी आमदार रमेश थोरात यांच्या उपस्थितीत पुन्हा प्रवेश केला.

Monday, September 23, 2019

दापोडीत बिबटयाचे ठसे दिसल्याने भीतीचे वातावरण !




डी न्यूज लाइव्ह केडगांव प्रतिनिधि : ता.२४ सप्टेंबर २०१९

दापोडी तालुका दौंड़ येथे  बिबट्यांची ठसे दिसल्याने नागरिकांमध्ये भितिचे वातावरण  निर्माण झाले आहे.    गेल्या वर्षी दापोडी  येथे ९ लोकांवर बिबट्या सदृश प्रान्याने लोकांवर हल्ला केला होता.

 त्यानंतर पिंजरा लावण्यात आला होता परंतु  बिबट्या पिंज-यात काही अडकला नाही.  
       दापोडी-कडेठाण ओढ-यालगत असणा-या शेतात बिबट्याचे ठसे दिसुन आले आहेत.
या भागात उसाचे शेत मोठ्या प्रमानात असुन पानी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
त्यामूळे बिबट्याचा वावर या भागात ब-याच दिवसा पासून असू शकतो.

सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे ठसे स्पष्ट दिसले आहेत.  या भागात पिजंरा लावला जाणार असुन लोकांनी सावध राहण्याचे आवहन वनविभागा कडुन देण्यात आले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघ डॉक्टर सेलच्या अध्यक्ष पदी वंदना मोहिते यांची नियुक्ति !



डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधि:ता.२४ सप्टेंबर २०१९

राष्ट्र्वादी डॉक्टर सेलच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी डॉ.वंदना मोहिते यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
सदर नियुक्ति पत्र बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सूळे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ.शिवदिप उंद्रे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्र्वादीचे अध्यक्ष रविंद्र कंधारे उपस्थित होते.याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सदस्य अशोक खळदकर,जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे,युवक अध्यक्ष विकास खळदकर,अजित शितोळे, वसंतराव वाघोले ,अर्जुन वाघोले, दिपाली पवार व आदि मान्यवर उपस्थित होते.

खोपोड़ी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध प्रफुल शितोळे यांची निवड



डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधि : ता.२३ सप्टेंबर २०१९

खोपोडी ता.दौड गावची उपसरपंच पदाची निवडणूक आज ता.२३ रोजी ग्रामविकास अधिकारी जाधव यांच्या अधिपत्याखाली पार पडली.
पूर्वी उपसरपंच पदावर असलेल्या रोहिणी शितोळे यांनी राजीनामा दिला.
रिक्त झालेल्या उपसरपंच पदी अपक्ष निवडून आलेले प्रफुल्ल शितोळे यांनी फॉर्म भरल्यानंतर कोणाचाही फॉर्म न आल्याने निवडणूक अधिकारी जाधव यांनी बिनविरोध उपसरंपच म्हणून प्रफुल्ल शितोळे यांची निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी सरपंच सुवर्णा साळवे,सदस्या रोहिणी शितोळे,सदस्य भाऊसाहेब मेमाणे,खोपोडी विकास सोसाइटीचे चेअरमन भाऊसाहेब हंडाळ,संचालक दत्तात्रय शितोळे, राजाराम कदम,अंबादास शितोळे, रामचंद्र निकम,भाऊसाहेब शितोळे, किसनराव पवार, बाळासो निकम,पोपट जाधव, भगवान साळवे,योगेश शितोळे, रवींद्र शितोळे व आदि मान्यवर उपस्थित होते.

Saturday, September 21, 2019

पारगाव येथील परप्रांतीय तरुण गायब !


पारगाव येथील परप्रांतीय तरुण गायब !

डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधि:ता.२२ सप्टेंबर २०१९

 पारगाव ता.दौंड जिल्हा पुणे येथून किराणा माल घेऊन येतो असे सांगून गेलेला पुष्पदर कुमार हा तरुण अजुन पर्यंत परत आलाच नाही.

पुष्पदर शिशपाल कुमार (वय 19) रंग काळा-सावळा उंची 5 फुट, 6 इंच,आंगात काळे रंगांचे लाईन असलेला चेक्स शर्ट, पायात चप्पल,डोळे काळे,केस काळे अशा प्रकारे वर्णन आहे.                                   
 सदर हा मूलगा कोणास आढळल्यास संपर्क करा.   9027705681,9756578893 सदर या क्रमांकास संपर्क करून त्वरित कळवावे.    

  सदर मूलगा कुणास सापडल्यास योग्य तो इनाम दिला जाईल.

Monday, September 16, 2019

ClBIL SCORE काय असतंय ???


ClBIL SCORE    काय असतंय ???

हे सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?

हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून 
या कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये .

Credit Information Bureau Ltd . या कंपनीची  स्थापना झाली .

आज या कंपनीचे नाव TransUnion CIBIL Ltd असे आहे .

ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे .

आणि यावर RBI ची मॉनीटरींग आहे .

समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला .
तर बँक म्हणते दोन . तीन दिवसांनी या ! 
आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ? 
तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा CIBIL रिपोर्ट मागावते .
आणि त्याची पेमेंट हिस्टरी , तसेच त्याचा CIBIL स्कोर चेक करते ? 

जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर , नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़. 

CIBIL स्कोर हा 
300- - - - - - - ते -- -- -- -- 900 
मध्ये मोजला जातो .

जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल .

पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा ! 
कर्ज मिळतच नाही .

म्हणजे समजलं ! 
कि बँका कर्ज  देणे का नाकारतात ? 
तर CIBIL Score नीट नसतो .

* CIBIL Score कमी का होतो ?  *

1) कर्जाचा EMl वेळेवर न भरणे .
2) कर्जाची परतफेडच न करणे .
3) चेक बाऊन्स होणे 
4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे 
5) स्वतःवर असणारे कर्ज NPA मध्ये जाऊ देणे 
6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे .

यामुळे CIBIL score वर वाईट परिणाम होतात .

बघा , मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी , शेवटी आतून त्या एकच असतात , त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते .

याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण  बँकांना आणि फायनान्स कंपनी ला मूर्ख बनवू शकत नाही .

बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे , पण लोन अमाऊंट  योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते .

तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL score सुधारेल ?

1) EMI वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका .

2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट ) 

3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan Digital loan  कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत , ही शिस्त सांभाळा 

4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या .

5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही .

6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा .

CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे  म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन  सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते .

या मध्ये 
-1
NA - No Activity
NH - No History 

असे पर्याय दिसू शकतात .

तर काय करा कि , एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा  , अशा प्रकारे  CIBIL मध्ये आपली History तयार होईल .


म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज , 
बुडवू तर नकाच , परंतु वेळेत फेडा ! 

नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही .

Friday, September 13, 2019

पूरग्रस्त भागातील मुलांना शालेय साहित्याचे वाटप !


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.१३ सप्टेंबर २०१९
निनाद फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने अंकलखोप येथील अंगणवाडी(माळीभाग) येथे विदयार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
     समाजसेवेची आस असणाऱ्या काही तरुणांनी मिळून “निनाद फाऊंडेशन” ची स्थापना केली आहे. हे फाऊंडेशन पर्यावरण क्षेत्रात सतत कार्यरत असून पर्यावरणातील विविध समस्या सोडवण्यासाठी नवनवीन कल्पनांचा वापर करण्यात सतत अग्रभागी असते.नुकत्याच येवून गेलेल्या महापूरामुळे शालेय विदयार्थ्यांचेही मोठे हाल झाले. त्यांच्या शैक्षणिक साहित्याचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले. म्हणूनच शालेय विद्यार्थ्याना शालेय उपयोगी साहित्याची मदत करण्यासाठी निनाद फाऊंडेशनने अंकलखोप ता. पलूस जि. सांगली येथील मळी भागातील अंगणवाडी क्र. 156   मध्ये शालेय विद्यार्थ्यांना ब्लॅक बोर्ड,टेबल,नेत्यांचे फोटो,कचरा पेटी,घड्याळ,चटई, पटाके,अंकलीपी,वह्या,पाणी बॉटल,जेवणाचे डब्बे,कंपास बॉक्स, खेळणी,रंग पेन ,मुलांना खाऊ अशाप्रकारचे शालेय साहित्याचे वाटप केले.

Wednesday, September 11, 2019

दौंड विधानसभेसाठी शिवसेनेच्या ईच्छुकांच्या मुलाखती !



डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधि : ता.११ सप्टेंबर २०१९

पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभेसाठी शिवसेना पक्षाचे इच्छुकांनी शिवसेना भवन दादर येथे मुलाखती दिनांक 10 सप्टेंबर 2019 रोजी दिल्या आहेत.
त्यामध्ये शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक शरदचंद्र सूर्यवंशी यांनी दौंडमधून तसेच उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनीही उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून अर्जासोबत मुलाखती दिली आहे.
शिवसेना पक्षाच्या आदेशानुसार  स्वबळावर निवडणूक झाली तरी शिवसेनेकडे जोरदार तयारी व सक्षम उमेदवार असल्याचे याठिकाणी सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न तसेच रस्त्यांचा प्रश्न कायम भेडसावत आहे. मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे त्यामुळे लोकांचा असंतोष आहे.
 त्याचप्रमाणे बेरोजगारी,महागाई, दूध व शेतीमालास कमी बाजारभाव,या बाबतींमध्ये दौंड तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी कुठल्याही प्रकारची उपाययोजना केल्याचे दिसून येत नसल्याने प्रस्थापितांच्या  विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये  रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी नारायण जगताप तर व्हा.चेअरमन पदी श्रीरंग म्हस्के !


दौंड प्रतिनिधी : ता.११ सप्टेंबर २०१९

दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी नारायण रामचन्द्र  जगताप तर व्हा.चेअरमन पदी श्रीरंग सखाराम म्हस्के यांची एक मताने निवड करण्यात आली.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात,अप्पासाहेब पवार,दिलीप हंडाळ,विरधवल जगदळे,झुंबर गायकवाड,मधुकर दोरगे,योगिनी दिवेकर,सयाजी ताकवने,निवडणुक निर्णय आधिकारी साह्य्क निबंधक टकसाले व आदी मान्यवर उपस्थित होते.

डी न्यूज लाईव्ह प्रस्तुत | विधानसभेचा राजकीय आखाडा २०१९ !

Tuesday, September 10, 2019

प्रशासनाला जागं करण्यासाठी कचेरी समोर गाढवाच लग्न !



दौंड प्रतिनिधि : ता.१० सप्टेंबर २०१९ 

विविध मागण्यांसाठी माहिती सेवाभावी संस्था व किसान जनक्रांती तर्फे तहसीलदार कचेरी दौंड समोर प्रशासनाला जाग यावी म्हणून गाढवाचं लग्न  करत आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले.

दौंड तालुक्यातील कुरकुंभ,पांढरेवाडी MIDC मधील धोकादायक कंपन्यांची चौकशी करून त्या बंद  करण्यात याव्या त्यासाठी माहितीसेवा भावी समिती व किसान जनक्रांती सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे.यामध्ये कुरकुंभ पांढरेवाडी MIDC मधील अल्कली अलाईन्स सारख्या धोकादायक कंपन्या बंद  करण्यात याव्या तसेच MIDC परिसरातील नापीक झालेल्या जमिनीतील मातीची चाचणी करून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी तसेच कुरकुंभ येथील स्थानिक तरुणांना 80% नोकऱ्या मिळाव्यात.
दौंड शहरातील पूरग्रस्तांना व शेतकऱ्यांच्या जमिनीचा पंचनामा करून त्वरित मदत मिळावी तसेच भामाआसखेड च्या पुनर्वसनचा शेरा कमी करून मिळणे व इत्यादी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
 यामध्ये गाढवाचं लग्न  लावत  प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

दौंड | खडकी | विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी रमेश थोरात यांची घोड्यावरून मिरवणूक !


डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.१० सप्टेंबर २०१९ (खडकी)
  
खडकी ता.दौंड येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन व  लोकार्पण समारंभ सोहळा पार पडला.
माजी आमदार रमेश थोरात व जि.प.सदस्य वीरधवल जगदाळे यांची वाजत गाजत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली होती.विकासनिधी हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच वापरला पाहिजे.व त्याचा विनियोग हा चांगल्या कार्यासाठी केला पाहिजे असे यावेळी रमेश थोरात यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात,तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे व आदि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.

त्याच बरोबर यावेळी पांडुरंग मेरगळ,उत्तम आटोळे,सारिका पानसरे,दिलीप हंडाळ,नितीन दोरगे,विकास खळदकर,अजित शितोळे तसेच खडकी पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन,संचालक आणि आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभेचा राजकीय आखाडा २०१९ - दौंड | विकासकामांच्या कोटीच्या योजना फसव्...

Monday, September 9, 2019

झगमगाट सोडून साध्या पद्धतीने श्रीची स्थापना !


लोणी काळभोर - प्रतिनिधी - येथील शिवतेज मित्र मंडळाने साध्या पद्धतीने श्रीची स्थापना केली. या मंडळाने लहान बालगोपाळासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मंडळाचे अध्यक्ष दिपक भुजबळ व उपाध्यक्ष तुषार कोलते.

          मूनलाईट मित्र मंडळ याने गणेशाची स्थापना केली आहे. या मंडळाचे अध्यक्ष विक्रम संजय ठोंबरे व उपाध्यक्ष जितेश प्रकाश बागुल हे आहे.

        श्रीकृष्ण मित्र मंडळ याने बागेच्या राजाची कायमस्वरूपी गणेशाची साधेपणाने स्थापना करण्यात आली आहे. या वेळी मंडळाने मांडवाचा खर्च हा कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.

          शितळादेवी मित्र मंडळाने डोगरचे देखावे करून त्यामध्ये श्रीची स्थापना केली आहे. मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य उपाध्ये व उपाध्यक्ष तुषार भाले या मंडळाचे मार्गदर्शक आभिमन्यू उपाध्ये हवेली तालुका  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस हे होय.    

दौंड | पारगाव | टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; एक जखमी !


डी न्यूज लाइव्ह प्रतिनिधि : ता.०९ सप्टेंबर २०१९        
                                  
 खोपोडी ता.दौंड येथे टेम्पोची मोटरसायकलला धडक बसल्याने एक ठार तर एक जखमी झाला आहे.
 सविस्तर माहिती अशी की, दीपक  बबन ताकवने व त्यांचा मूलगा मयुर ताकवने मोटरसायकल नंबर एम.एच.42 ए.बी.1924 वरुन केडगावकडे चालले होते.
समोरुन एक टेम्पो  नंबर एम.एच.14 सी.पी 4823  विरुद्ध दिशेने येऊन त्याची ठोस मोटरसायकलला बसल्याने दोघे मोटरसायकल वरुन खाली पडले. त्यांच्या डोक्यास,बरगडीस, पायास इतर ठिकाणी मार लागला होता.
 दोघानाही दवाखान्यत नेण्यात आले होते.
 दीपक ताकवनेयाना मृत घोषित केले.तर मयुर याला उपचारासाठी लोणी काळभोर येथे खाजगी दवाखाण्यात दाखल केले आहे. ही घटना 9/9/2019 रोजी घडली.                                     पूढिल तपास पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे हे करत आहे.

Sunday, September 8, 2019

उमेदवार कुणीही असला तरी चिन्ह कमळच - गणेश आखाडे !




डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.०८ सप्टेंबर २०१९ 

येणा-या विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यात भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर निवडणुक लढवनार असुन वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असल्याची माहिती दौंडचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष  गणेश आखाडे  यांनी सांगितले.
 उमेदवार कोण असेल याबाबत विचारले असता उमेदवार कोणिही आसला तरी चिन्ह कमळच  असनार असल्याचे डी न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले कि, ५० हजार सदस्य नोंदणी झाली असुन अजून प्रक्रिया चालू आहे.
दौंड तालुक्यात ११९७५  शेतक-यांना  दीड लाख पर्यंत कर्जमाफी झाली आहे.
४६ हजार कुटूंबानी २ हजार रुपयाचा लाभ घेतला आहे.14 हजार कुटूबानी उज्ज्वला गैस योजनेचा लाभ घेतला आहे.अशा  अनेक योजना लाभ अनेक कुटूबनी घेतला आहे.इतर नाराज कार्यकर्ते आमच्या संपर्कामध्ये आहे. व ते लवकरच प्रवेश करनार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.भारतीय जनता पार्टी कोणाला ऊमेदवार घोषीत करनार याकडे  तालुक्यचे लश्य लागुन राहिले आहे.


Saturday, September 7, 2019

रासपा कार्यकत्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये जाहिर प्रवेश !

   
डी न्यूज लाइव प्रतिनिधि : ता.०७ सप्टेंबर 
दापोडी ग्रामपंचायतीचे सदस्य व वि.का.सोसायटीचे चेअरमन  बबन खोडवे यांचा रासप मधुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समर्थकांसह जाहीर प्रवेश करण्यात आला आहे.
दापोडी तालुका दौंड येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. गायकवाड वस्ती, इगंले वस्ती येथे   रस्ताचे   खडीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.

तर शिदगुर वस्ती येथे खडीकरण,नानगाव ते रुपनवर वस्ती रस्त्याचे भूमिपूजन केले.
समाज मंदिर सभा मंडपचे भूमिपूजन,वडवली येथे  सिंमिटी  रस्त्याचे उदघाटन करण्यात आले.तर नामदेव ताकवणे जिल्हा नियोजन समिती सदस्य यांनी पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी 10 लाख निधी दिला होता.
ते काम पूर्ण झाले याचे उदघाटन माजी आमदार,जिल्हा बैंकचे चेअरमन रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आप्पसाहेब पवार, रामभाऊ टुले, नामदेव ताकवने, दिलीप हंडाळ, सयाजी ताकवने, राणी ताई शेळके, नंदा ताई भांडवलकर, शिवाजी रुपनवर, सुहास रुपनवर, सुनिल मोहिते, सुनिल रुपनवर, हितेज रुपनवर, अजीज शेख, अशोक नरुटे, आदि मान्यवर उपस्थित होते.                                                                   यावेळी दापोडी ग्रामपंचायतीचे मा.सदस्य व वि.का.सोसायटीचे मा.चेअरमन बबन खोडवे यांनी रासप मधुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समर्थकांसह जाहीर प्रवेश केला आहे.

Wednesday, September 4, 2019

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून बालकाश्रमातील मुलांना जेवण व शैक्षणिक साहित्याचे वाटप !



डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी- ता.०४ सप्टेंबर २०१९ 

वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळुन पिंपळगाव(ता.दौंड)येथील अशोक तुकाराम खोरकर यांनी आपल्या नातवाचा मयुरेश रवींद्र खोरकर याचा वाढदिवस गलांडवाडी(ता.दौंड) येथील अनाजी खाडे बालकश्रमातील मुलांसमवेत साजरा केला.
वाढदिवसानिमित्त येथील मुलांना जेवन व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच आर्थिक मदत देखिल करण्यात आली. या बालकश्रमात सुमारे तिस विद्यार्थी असून शासनाचे एक ही रूपयाचे अनुदान मिळत नसताना या मुलांचे संगोपन येथे केले जाते.
मयुरेश सह श्रावणी चोरमले,तृप्ती खोरकर-मदने, व बालकाश्रमातील विद्यार्थी गणेश  धायगुडे याचाही 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने साजरा करण्यात आला.यावेळी मुलांनी आपल्या अप्रतिम आवाजात हरिपाठाचे सादरीकरण केले.
हाँटेलमध्ये मध्ये केलेल्या पार्टी पेक्षा अनाथ आश्रमात केलेल्या कार्यक्रमाचा आनंद कित्येक पटीने जास्त आहे व प्रत्येकाने याच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे अवाहन यावेळी खोरकर कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी अशोक खोरकर,नाना चोरमले,गजानन मदने,दिपक शिंदे,पप्पु चोरमले,विकास गडधे,सुजाता गडधे,पुजा गडधे,सतिश नातु,शरद धुमाळ, सौरभ बंड,बनकर,लता खोरकर,संगिता तिखोळे, संस्थेचे व्यवस्थापक बापु गोफणे आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.