केडगाव प्रतिनिधी ता.२४ मार्च
जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता याची आता राज्य सरकारसह ग्रामपंचायतींनीही स्वच्छतेला प्राधान्य देत गावातून जंतुनाशक औषध फवारणी मोहीम हाती घेतली आहे.
तसेच एक भाग म्हणून आज दि.२४ मार्च रोजी दौंड तालुक्यातील दापोडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नंदा भांडवलकर यांच्या उपस्थितीमध्ये औषध फवारणी सुरू करण्यात आली. यावेळी दापोडी ग्रामपंचायत कर्मचारी, काही सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
औषध फवारणी अगोदर कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन म्हणून जनजागृती करणे, घराघरांतून कोरोना व्हायरसबाबत आवश्यक काळजी व उपाययोजना याची माहिती देण्यात आली.