Thursday, March 12, 2020

भाऊसाहेब चौगुले यांना राज्यस्तरीय सामाजिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान !



पारगाव प्रतिनिधी : ता.१२ मार्च २०२०

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने भाऊसाहेब चौगुले यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज सामाजिक कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्यामुळे आपले कार्य समाजाला प्रेरणादायी ठरणार आहे.म्हणूनच आपल्या कार्याची दखल घेऊन गुरुवार दि.१२ मार्च रोजी सांस्कृतिक आचार्य अत्रे सभागृह सासवड येथे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात भाऊसाहेब चौगुले यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले  (तंजावर तमिळनाडू) व्यंकोजीराजे यांचे १३वे वंशज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

भाऊसाहेब चौगुले हे गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य पुणेचे अध्यक्ष असून समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी नवनाथ गव्हाणे यांच्या विचारसरणीला प्रेरित होऊन जी.एस.एम राज्य अध्यक्ष प्रभाकर तपासे आणि उपाध्यक्ष सुभाष गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक कार्य करत आहेत.

कुटुंबातील गरीब परिस्थिती मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून चौगुले हे सध्या पशुपालन व्यवसाय करत आहे. विखुरलेल्या समाजाला संघटीत करून समाजहिताचे कार्य मोठ्या जोमाने हाती घेऊन गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य पुणे चे अध्यक्ष पद भाऊसाहेब चौगुले हे भूषवत आहेत.

यावेळी हा पुरस्कार प्रदान करताना संमेलनाध्यक्ष डॉ.जयप्रकाश घुमटकर,संस्थापक राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव,स्वागताध्यक्ष शिवाजीराव कोलते,निमंत्रक राजकुमार काळभोर,राजाभाऊ जगताप,संजय सोनवणे,गंगाराम जाधव,सुनील धिवार,रवींद्र फुले,नंदकुमार दिवसे, दत्ता भोंगळे,सुनील लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हा पुरस्कार स्वीकारताना रमेश पवार,नंदकुमार पवार, दत्तात्रय चौगुले,प्रदीप गव्हाणे,मच्छिन्द्र कोळेकर,दिपक पवार,गणेश पवार आदी उपस्थित होते.